१० दिवसात मास्क न घालणाऱ्या ५५६ जणांकडून पावणे तीन लाख रुपये दंड वसूल
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क घालणे बंधनकारक आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या १० दिवसात मास्क न घालणाऱ्या ५५६ जणांकडून २ लाख ७८ हजार रुपये दंड वसूल वसूल करण्यात आला.तर गुरुवारी दिवसभरात मास्क मास्क न घालणाऱ्या एकूण ५४ जणांकडून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडावर मास्क घालावा असे आवाहन करण्यात आले आहे.




0 Comments: