इमारत पाडण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकांकडून आठ कोटीची खंडणी उकळल्याचा आरोप

इमारत पाडण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकांकडून आठ कोटीची खंडणी उकळल्याचा आरोप

 इमारत पाडण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकांकडून आठ कोटीची खंडणी उकळल्याचा आरोप  

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील पूर्वेकडील नांदिवली येथील एका बांधकाम व्यावसायिकास इमारत पाडण्याची धमकी देउन  तब्बल आठ कोटीची खंडणी,सदनिका आणि दुकानातील गाळ्यांची ख़ंडणी उकळणा-या आरोपी  बंटी-बबली या चतुर दुकलीबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी  मागणी नांदिवली येथील रहिवासी आणि उद्योजक वर्गीस पदु म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली.

   नव-याच्या पश्चात  नांदिवली येथील सर्वे नं.१२/३/अ हि जमीन इंदिरा म्हात्रे यांच्या मालकीची होती.  या जमिनीवर खेमजी चौधरी या बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधली आहे.त्याचप्रमाणें दुसरे विकासक आर्यविक्रम सिंग यांनी देखील या जमिनीच्या दुसऱ्या तुकड्यावर इमारती बांधल्या. या इमारतीत रहिवासी रहायला आल्यानंतर विद्या विश्वनाथ म्हात्रेविश्वनाथ एकनाथ म्हात्रे ,सुनील एकनाथ म्हात्रेआणि एकनाथ गणपत म्हात्रे यांचा सदर जमिनीशी संबध नसताना खोटा हक्क सांगितला.त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे खोट्या तक्रारी केल्या.विश्वनाथ म्हात्रे कल्याण तहसीलदार कार्यालयात कारकून असल्याने  कृषक दाखल्यासाठी अडवणूक केली.विद्या म्हात्रे यांनी पालिकेतील ओळख दाखवत इमारत पाडण्याची कारवाईची धमकी देत वर्गीस म्हात्रे यांना भिती दाखवत सात कोटीची मागणी केली होती.जमीन मालक इंदिरा म्हात्रेविकासक चौधरी यांच्या कडून  कोटी रोख कोटी रुपये धनादेशाद्वारे कोटी तसेच  कोटी २४ लाख ९४ हजार रुपये किमतीच्या ४ सदनीका आणि सदरच्या सदनीका नोंदणी करण्यासाठी ३० लाख ३० हजार रुपयांचे शुल्क असा एकूण तब्बल ७ कोटी ५५ लाख २४  हजार रुपये जबरदस्तीने व फसवणूक करुन विद्या म्हात्रे तक्रारी मागे घेतल्याचा आरोप पत्रकार परिषदेत  वर्गीस म्हात्रे यांनी केला.विकासक आर्यविक्रम सिंग यांच्या कडून लाखो रुपयांची ख़ंडणी आणि सदनिका लाटल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. विद्या विश्वनाथ म्हात्रेविश्वनाथ एकनाथ म्हात्रे ,सुनील एकनाथ म्हात्रेआणि एकनाथ गणपत म्हात्रे  यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करुन आम्हाला  न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.दयानंद भारद्वाजहितेश वर्गीस म्हात्रेआर्य विक्रमसिंह हे बांधकाम व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

0 Comments: