नरडवे प्रकल्पग्रस्त सानुग्रह अनुदानात गैरव्यवहारांचा दाट संशय
पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारे सानुग्रह अनुदान मिळालेल्या कुटुंबांची यादी द्या अशी मागणी करूनही प्रकल्पग्रस्तांना यादी दिलेली नाही यामुळे या प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अशासकीय सदस्य संतोष सावंत यांनी केला आहे माध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांची बैठक अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर प्रकल्पग्रस्त कृती समिती मुंबईचे अध्यक्ष सुरेश सहदेव ढवळ, प्रकाश सावंत, मधुकर शिंदे, लुईस डिसोझा,हनुमान शिंदे अन्य प्रकल्पग्रस्त व कोकण सिंचन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ,माधव कदम आशिष चौघुले मंगेश माणगावकर आदी या सभेत उपस्थित होते.21 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते मात्र या गावांमध्ये इतर महसूल गावातील प्रकल्पग्रस्तांची नावे समाविष्ट करून त्यांनी व्यक्त केला आहे समितीच्या पदाधिकारी यांनी
मंगेश जोशी यांच्यासमोर सानुग्रह अनुदान दिलेल्या लाभार्थीची यादी मिळावी अशी मागणी केली होती मात्र पाटबंधारे विभागाकडून उशिरापर्यंत देण्यात आली नाही यादी मिळावी अशी मागणी पंधरा दिवसांपूर्वी आपण केली होती परंतु ज्या लाभार्थीना अनुदान वाटप झाले आहे ती यादी अद्यापही देण्यात आली नाही. विवरणपत्र न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तामध्ये नाराजी आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर असून कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार नक्कीच असावा असा दाट संशय येत असल्याचे बोलले जात आहे




0 Comments: