कथा : गाठोडे - भटू हरचंद जगदेव जापीकर.....

कथा : गाठोडे - भटू हरचंद जगदेव जापीकर.....

 कथा - गाठोडे

         भाग २५ वा

            मनू भटूकडून आल्या दिवसा पासून घरात आनंदात वावरत आहे. गेल्या विस वर्षांपासून आपल्या नव-याच्या आगमनाची वाट बघत आली होती. आणी कितीही वर्ष वाया गेले असले तरी आज तिच्या नव-याने तिला भरोसा दिला होता ब-याच वर्षांनी का असेना पण त्याने तिला आपल्या कुशीत घेऊन म्हटलं होते की, 'मनू तू माझ्यावर भरोसा ठेव, तुला असेच वा-यावर सोडणार नाही. असे अशवासन दिले होते.

           लगेच तिच्या मनात शक्का आली मनातल्या मनात  म्हणाली,खरोखर मला जवळ करेल भटू ? का मग मला  उरलेले आयुष्य ही असेच अश्रू ढाळत राहावे लागेल. लगेच तिचे मन तिला म्हणाले, नाही भटू असे करुच शकत नाही. मला भटूवर पुर्ण विश्वास ठेवाच लागे त्या शिवाय मला पर्याय नाही. तिचे मन तिला वेगवेगळे प्रश्न करुन भडाळून सोडत होते. पण ती मनातून सुखावली होती.

           सरीता बाई बसल्या जागी विचारात गुंतल्या होत्या मुलीच्या आनंदासाठी त्या मुलगी जसे सांगेन तसे त्या करत आलेल्या होत्या. अखेर मुलीच्या प्रयत्नला यश आल्याचे त्यांना दिसत होते म्हणून त्याही काही आवशी सुखावल्या होत्या.

           तेवढ्या वहिनी आल्या त्या सरीता बाईला म्हणाल्या ,आई काय करतात आपल्या चेहऱ्यावर चिंताजनक भाव झळकतायत काय कारण आपल्या उदासिनतेच वहीणी म्हणाल्या.

           काही नाही ग पोरी, बसले होते. चिंता व्यक्त करत ईचे कसे होईल म्हणून सरीता बाई म्हणाल्या.

           'पण आई, तुम्ही तर भटू भावजीकडे जावून आल्या ना. वहीणी म्हणाल्या.

           हो जावून आलो,  भटूकडे त्याच्या घरीच गले होते. सरीता बाई म्हणाल्या. 

           आई तुम्ही ! भटू भावजीच्या घरी,काय म्हणतात मला विश्र्वास बसत नाही, त्याच्या पत्नी असतील घरी मग त्या काय म्हणाल्या, वहीणीने आश्चर्याने सरीताबाईना विचारले.

           हो, ग बाई ती घरी नव्हती म्हणून तर गेलो, मुलांना घेवून माहेरी गेली आहे म्हणे,सरीता बाई म्हणाल्या.

           काय चर्चा झाल्या आई, काही समाधान जनक असे काही वाटले का ? वहीणी म्हणाल्या

           सरीता बाई बसल्या जागी थोडे संयमित पणे स्मितकरत हो, झाले ना समाधान मनूचे तसे त्यांच्यात काय चर्चा झाली ते काही मला कळले नाही बंद खोलीत दोघी काय बोलले ते मला समजले नाही. पण जेव्हा ती बेडरूम च्या बाहेर पडली तेव्हा तिचा चेहरा खुलला होता आणि आनंदात मला मिठीत घेत म्हणाली, आई भटू तयार झाला गं ! तयार झाला.आता मला माहीतच नाही तो कशासाठी तयार झाला पण मी काही बोलली नाही कशाला तीच्या अनंदावर विरजन घालायचे म्हणून गप्प राहीली.सरीता बाई म्हणाल्या

           वहीणीला थोडे हसू आले. बेडरूम, बेडरूम मध्ये काय बोलावे ते मला समजत नाही. आई कोणत्या अशा गोष्टी बंद खोलीत झाल्या असाव्यात काही आदांज आहे का आपल्याला. वहीणी म्हणाल्या

           नाही गं बाय मला कशा कळणार त्या बंद खोलीतील गोष्टी, तुच सांग मी कशी सांगू शकते जे आहे ते बरे आहे. यावर मला काही म्हणायचे नाही. आणि त्यात शाहण्या माणसाने मधी पडू नये, असे तरी मला वाटते.आणी तू ही त्याच्यात डोके खुपसू नये. सरीताबाई आपल्या सुनेला म्हणाल्या

           म्हणजे आई, आपण नुस्ते बघत राहावे वहीणी म्हणाल्या.

           होय, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का ? ती करते तिच्या मर्जिने तिला करु दे ! सरीता बाई म्हणाल्या.

           पण आई, ताईना ही कळायला हवे वहीणी म्हणाल्या.

           बेटा कोण सांगणार, मी तर सांगून सांगून थकले, काय सांगायचे राहीले तिला अगोदरच हे तेव्हा हायात होते. तेव्हा मी म्हणाली सुध्दा तू काही काळजी करु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तूझ्या वडीलांना मी सांभाळून घेईन पण तेव्हा हिच म्हणत होते, मी माझे वडीलांना अपमानीत होताना नाही बघू शकत मुर्खीला येवढे ही समजले नाही. बाप का आपल्याला जन्माला पुरणार आहे.येवडे ही समजू नये, का या कारटीला. तिचा विषयी आलास तर माझे नुसते डोके भनभनते नुसता ऊब आले मनाला सरीताबाई म्हणाल्या.

           तेवढयात मनू नटूनथटून आपल्या आई जवळ येत म्हणाली, आई मी कशी दिसते गं. तिचे लक्ष फक्त तिने पेरावे केलेल्या छानसा डेर्सवर होता बाजुला आईच्या जवळ वहीनी होत्या तिला त्या तिच्या तंत्रीत कळले नाही.वहीणीने तिच्याकडे बघत म्हणाल्या,खरच खुपच सुरेख दिसतायत मनू वहीणीला बघून थोडी लाजली म्हणाली, आय्या वहीणी तुम्ही, खरंच सुरेख दिसते मी वहीणीने हाताचा इशारा करत पेरावे सुरेख असल्याचे प्रमाण दिले सरीता बाई गालातल्या गालात हसल्या आणी उठून माझ्या लेकीला कुणाची नजर लागू नये म्हणत त्यांनी आपल्या डोळ्यांच्या काणोख्यात बोट लावून थोडे काजळ काळले दिट लागू नये म्हणून गालाच्या बाजूला काळा टिका लावत म्हणाल्या, सूरेख गं बाई सुरेख माझ्या लेकीचे स्वंप्न पुर्ण होतांना दिसते.

           वहिणी मनातल्या मनात म्हणाल्या, आज सुर्य पच्छिमे कडून उगवला वाटत बाई खुपच खुष दिसतायत.

          खरच जीवनात ज्या गोष्टीसाठी माणूस आसूसलेला असतो तिच गोष्ट आपल्याला नकळत मिळाली तर त्याचा आनंद होणारच ना आणि तो आनंद मनात दुगुनित होईल मन हर्षून निघेल तसेच मनूचे झाले होते. तेवढयात आईने तिला विचारले तु दिसतेच खरच सुरेख पण निघालीस कुठे साजश्रुगार करुन तेव्हा मनू आपल्या आई सरीता बाईला म्हणाली,निघाली नाही. मला घेयायला येणार आहे भटू त्यानेच मला फोन करुन सांगितले की, मनू तु तयार राहा मी तुला घेण्यासाठी येतो म्हणून म्हणाला आपल्याला जरा एका मित्राकडे जायायचे आहे. मी म्हणाली मी तयार आहे. तु लवकर ये मी तुझी वाट पाहाते.येईलच येवढयात मी आई जावू येते त्याच्या सोबत कुठे का असेना तो नवरा आहे त्याचे कर्तव्य बजवतोस तर बजव म्हणावं.

           सरीता बाई बोलणार तेवढ्यात वहीणी म्हणाल्या, 'कुठे नेणार आहेत भटू भावजी तुम्हाला ताई,

           त्यांच्या मित्राकडे तो म्हणाला बरेच वर्ष झाले भेटले नाहीत.आता मला ही घेवून जावासे वाटले असणार ती घरी नाही तर ईला नेवू असे मनात आले असणार बहुतेक मनू म्हणाली.

           तेवढयात तुषार आपले दपत्तर घेवून घरातुन बाहेर पडण्याचा तयारीत होता त्याने त्याच्या आईला विचारले आई आत्या कुठे चालल्या का ? 

           वहीनी म्हणाली (आई )  हो त्या मामाजी सोबत बाहेर जाणार आहेत.

           तुषारणे आश्चर्याने आईला विचारले कोन मामाजी मी अगोदर बघीतले नाही.

           आई म्हणाली ,भेटायचे तुला येतीलच ते आत्याला घेयायला मग तु ओळखतोस, बघीतले ना तु त्यांना कितेक वेळा 

           तुषार आपले डोके खाजवत आठवू लागला होता.त्याने आपल्या आईकडे बघीतले आणी तो शाळेत जायायला निघाला.त्याची आई ही त्याच्याकडे फक्त बघत राहीली.

             मनू भटूच्या येण्याची वाट बघत होते. भटू कुठून येतो, कसा येतो, आणि कशावर येतो, आणि कुठे नेतो हाच विचार तिच्या मनात पिंगा घालत होता.तिचे मन अगदी बेचैन झाले होते. ती एका ठिकाणी थिर थांबत नव्हती जनू तिच्या पायाला भिंगरीच होती.कधी घरात तर कधी घराच्या आवारात सारख्या ये-या जा-या घालीत होती. कधी भटू येतो आणि मला नेतो तिला असे झाले होते.तिला ही आयती आलेली संधीचे सोने करायचे होते.आणी ही संधी ती सोडणार नव्हती.

             मनूची सारखी उठबस चालू होती कधी आवारात जावून कुठल्या रिक्षा मधे तर येत नाही ना चटकन तिच्या मनात येत असे भटू फसवत तर नाही ना ? मग उशिर का होतोय त्याला येयायला का होतोय उशिर. उशिरा वरुन तिला आठवले या उशिरानेच भटूने मला नाकारले होते. उशिर उशिर 'हा उशिर माझ्या जीवनाचा नाश करणारा नको ठरो देवा ! जिही गाडी आली त्यात भटूला ढुंकून पाहू लागली. जीव तिचा कासाविस होतं होता. भटू दिसत नाही म्हणून मन तिचे बधिर झाले होते. ती फे-या मारीत होती. पण तिच्या आईचे लक्ष तिच्यावर होत.सरीताबाचा जीव तिळ तिळ तुटत होता. तिला बघून आतल्या आत कुढत होते.पण मुलीच्या ईच्छा पुढे त्यांना काहीच करता येत नव्हते त्या बघ्याची भूमिका बजावत होत्या.

             केव्हाशी भटू आतल्या बोडीतून पिप पिंप करत मोटारसायकल वरून तिच्या जवळ येवून पोहोचतो मोटरसायकल एकदम अंगावर आली म्हणून ती स्वत:ला वाचवत मनातल्या मनात काहीतरी बळबळत मोटरसायकल लावल्यास दम देत म्हणाली, "मेल्याला तेवढी जागा पडली  दिसत नाही अंगावर घालतोस का ? मोटरसायकल वाला अगदी तिच्या जवळ येवून थांबला पण ती त्याच्याकडे बघणे टाळते आणी कुठल्या रिक्षात भटू दिसतो का बघते भटू अगदी जवळ येवून पोहोचला आणी त्यानी आपले डोक्यातले हेल्मेट बाजूला घेतले म्हणाला, मला उशिर तर नाही ना झाला. चटकन मनूने त्याला ओळखले आणी ती जी मोटरसायकल तिच्या अंगावर आली होती तिला अगदी खेटून थांबली आणी म्हणाली,हे काय आपण या मोटरसायकलने जायायचे 

             भटूने होकार आर्थी मान हलवून तिला संमती दिली बसा राणी साहेब म्हणत तिला मोटारसायकल वर बसायची अज्ञा दिली.

             मनू म्हणाली,भटू थांब थोडा, आई केव्हाची तळमळ करते तिला तर मला बोलू दे मी जाते म्हणून आणी असेच जायायचे का घरात नाही येणार आई तुझी वाट बघत होत्या त्यांना तर भेट 

             भटूने मोटारसायकल वरूनच सरीताबाईना आवाज दिला आई आई आम्ही येतो हो,.

             सरीता बाईने भटूचा आवाज ओळखून त्या घरातून बाहेर आल्या भटूला म्हणाल्या, भटू ये थोडे बस मग जा पण भटूने त्यांना मोटरसायकल वरुन हात हालवत बाय बाय करत आणी मनूला मागे बसून निघून गेला. सरीता बाई नुसत्या हुगड्या डोळ्यांनी बघत राहील्या. 

             मनू भटूची वाट बघून जरी तिचा जीव दमला असला पण भटू दिसताच तिचे मन प्रफुल्लीत झाले होते. म्हणून आज भटू जेथे नेईन तेथे ती जाणार होती. भटूच्या मागे बसून निघून गेलेले आयुष्य विसरुन ती मनसोक्तपणे आजच्या दिवसाचा आनंद भोगणार होती. ती जसी मोटरसायकलवर बसली तसी ती तीचे घर,आई,भाऊ वहीणी विसरून भटूच्या मागे बसून घट्ट पकडून जीवनाचा आनंद घेत होती. भटू मात्र जिकडे वाट फुटेल तिकडे जात होता.आणी मनू त्याच्या मागे बसून आपला आनंद उपभोग होती.

             आयुष्य तिचे कधीच संपले होते. जेव्हा तिला स्पष्ट भटूने नकार दिला होता पण आज असा योगा-योग असा जुळून आला होता की,भटूने ब-याच दिवसाने नव्हे तर ब-याच वर्षांनी तिला एक नविन रिलीफ दिली होती. रिलीफ नव्हे जीवन जगण्यासाठी  नविन प्रेरणा नविन मार्ग मिळाला होता. आता तिला आपल्या आई आणि इतर घरातल्या नातेवाईकांना दाखवायचे होते की, माझ्या आयुष्यात मी जिकल्यांचे दाखवून दयायचे होते.आणी माझ्या पर्यत्नाना यश मिळाल्याचे ही 

             भटू तसा बिंधास्त होता.त्याला जे करायचे तेच तो करत आला होता.त्याचा मुळी स्वभाव आणी लहरीपणा मुळे अनेक वेळा चांगले काम करायला गेला तरी त्याची फसगत होत असायची जीवनातल्या या घडामोडी सामोर जाण्यांची त्याच्यात नेहमी उर्मी निर्माण होत असे आणि तो बिंधास्त जगत असायचा 

             आज भटू ही फिरण्याचा मुळ मधे होता जसे त्याने मनूला वादा केला होता तसाच तो आज तिनं संगे वागत होता.तो ही विसरला होता आपल्या घरी बायको पोरे आहेत जे मी करतो ते चुकीचे आहे.पण त्याची बायको आणि मुले हे गावाला गेली म्हणून तो मोकळ्या मनाने मनू सोबत फिरण्यात गुंतला होता.

            रात्रीचे बारा वाजत आले असतील थंडगार वारा सुटला होता सरीताबाई घराच्या आवारात चक्रा मारत होत्या त्यांचा जीव मनूच्या काळजीने कासाविस झाला होता. पोरगी सकाळ पासून गेले आजू तिचा तपास नाही फोन केला तर दोघांचा फोन नाॅट रिचेबल येतोय त्यांच्या मनांत अनेक विचार वारुडातून मुंग्या पडाव्या तसे पडत होते फोन लावतात तर फोन लागत नाही काय करावे ते कळत नाही पोरीच्या विचाराने त्या बेजार झाल्या होत्या त्यांचा डोळा कधी लागला तर त्यांना कळले नाही ?    

                                    भटू हरचंद जगदेव जापीकर.....

0 Comments: