मास्क न घालणाऱ्या ६० नागरिकांकडून ३० हजार रुपये दंड वसूल

मास्क न घालणाऱ्या ६० नागरिकांकडून ३० हजार रुपये दंड वसूल

 मास्क न घालणाऱ्या ६० नागरिकांकडून ३० हजार रुपये दंड वसूल

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात तोंडावर मास्क घालणे बंधणकारक असल्याने या नियमाचे उल्लघन करणाऱ्या नागरिकांवर पालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पालिका प्रशासनाकडून कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मंगळवारी मास्क न घालणाऱ्या ६० नागरिकांकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.`अ`प्रभागक्षेत्रातून ३००० रु.,`ब` प्रभागक्षेत्रातून ७,५०० रु.,`क`प्रभागक्षेत्रातून ८,५०० रु.,`जे`प्रभागक्षेत्रातून २,५०० रु.,`फ`प्रभागक्षेत्रातून १,५०० रु.,`ह`प्रभागक्षेत्रातून ५०० रु., `ग`प्रभागक्षेत्रातून २००० रु. आणि `आय` प्रभागक्षेत्रातून ४,५०० रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोनाचे संकट दुर होत नाही तोवर सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे असे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. मात्र काही नागरीक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.तर गर्दी करून नका असे आवाहन केले जाते.  

  

0 Comments: