महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मांग गारुडी समाज संघटनेने केले विनम्र अभिवादन

पत्रकार : प्रविण बेटकर

डोंबिवली (ठाणे)

संविधान निर्माते, परम-पूज्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४-व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२० रोजी न्यू भारत नगर कचोरी गाव येथे हिंदू मांग गारुडी समाज संघटना- महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे कल्याण डोंबिवली पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून बुद्ध पूजा पाठ, पंचशीला व मानवंदना घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित असलेल्या वरीष्ठ मंडळींनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार मांडले. मान. खासदार श्री. श्रीकांतजी शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष मान. श्री. दिपेशजी म्हात्रे, परिवहन सभापती- श्री. मनोज चौधरी, राजन चौधरी- (बजरंग दल), आशुतोष येवले (समाजसेवक) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे कल्याण युवा शहर अध्यक्ष- श्री बापूजी ढालवाले, उपाध्यक्ष-प्रशांत हेलोडे, तसेच स्थानिक समाजसेवक रतन त्रंबक ढालवाले, भिमराव सकट, गंभीर शिवा गायकवाड, दयाराम हातगाडे, अर्जुन भीमा सकट, अनिल शामराव कसबे, हिरामण लोंढे, विशाल ढालवाले, नामदेव ढालवाले आदी उपस्थित होते.

0 Comments: