डोंबिवली पश्चिमेकडील बेवारस वाहनांना उचलले

डोंबिवली पश्चिमेकडील बेवारस वाहनांना उचलले

 डोंबिवली पश्चिमेकडील बेवारस वाहनांना उचलले   



डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहने उचलण्यात आली.पालिकेच्या `ह` प्रभाग क्षेत्राकडून अश्या वाहनांना उचलून  डोंबिवली पूर्वेकडील खांबाळपाडा येथील वाहनतळ येथे ठेवण्यात आले.प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार,अधीक्षक सुखदेव धापोडकर,पथकप्रमुख विजय भोईर व कर्मचारी वर्ग यांनी दीनदयाल रो आणि महात्मा फुले रोडवरील बेवारस वाहने उचलली.यात ४ चारचाकी, १८ मोटरसायकल,१० स्कुटी अशी एकूण ३२ वाहने आहेत.याबाबत अधिक माहिती देताना पथकप्रमुख विजय भोईर यांनी अश्या प्रकारची कारवाई सुरु असते.अनेक दिवस अशी वाहने उभी असतात. अश्या वाहनांचे वारस येत नसल्याने अखेर वाहनांना उचलावे लागते.

0 Comments: