"बी कुल -पॅडल टु स्कूल "
त्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल तसेच शालेय विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. Rajendra Wankhde सर यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषदेच्या शाळेंना प्रेरणादायी पुस्तकांचा सेट भेट देण्यात आला. कौशल्य विकसित होण्यासाठी विविध पुस्तकांच्या वाचनाची गरज आहे, या अनुषंगाने गरजू विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल व विकास होईल. *42 पुस्तकांचा सेट बंधू नामदेव बेलदार सर यांच्या जिल्हा परिषद शाळा वेळुंजे शाळेस देण्यात आला. तसेच म.न.पा. शाळा क्रमांक 3 नांदूर येथील शाळेस देण्यात आला.
आदरणीय लीना बनसोड मॅडम यांनी या थरारक अनुभवाचे व कामगिरीचे खुप कौतुक केले व ऑनलाईन मीटिंग द्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत हे अनुभव सत्र आयोजीत करण्याचे जाहीर केले.
नाशिक सायकलिस्ट तर्फे प्रेरणादायी पुस्तक , उठा तुम्हीही जिंकणारच'याचेही कौतुक करून ,अनाथ, आदिवासी भागातील शाळेंसह जि. प.शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा अभिनव उपक्रम व संकल्पना नक्कीच प्रेरणादायी आहे.
धन्यवाद....
आपला स्नेही
अशोक कुमावत





0 Comments: