क्षणात माणसाच्या हृदयात घर करणारे जिल्हाधिकारी मा.सुरजजी मांढरे साहेब
माणसातला देव माणूस
माझ्या ' उठा तुम्हीही जिंकणारच' या जग बदलू पाहणाऱ्या प्रेरणादायी पुस्तक प्रकाशनासाठी दि.16/11/2020 रोजी साहेबांनी व्यक्तिशः शुभेच्छा दिल्यात.आणि काल अचानक माझ्या व्हाट्सएपवर साहेबांचा मेसेज आला .
Tomorrow come at 4 pm
मनात आनंदाची एक वेगळीच लकेर उत्साहाचे 360 डिग्री रेखाटन पूर्ण करत मी क्षणभर एका वेगळ्या जगात संचार करत मनातल्या मनात भटकंती करू लागलो.एका सामान्य शिक्षकाची पोस्ट बघणे,त्याला रिप्लाय देणे. हे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे नाही तर माणसात देव बघणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे हृदय होते.
डीसीप्लिन पाळायचे म्हणून मी माझ्या कुटुंबासह 3.30 वाजताच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.गेटवरील स्टाफने पाससाठी मागणी केली तर त्यांना साहेबांचा मेसेज दाखविला आणि आम्हा सर्वांना कार्यालायकडे जाण्याची परवानगी मिळाली.साहेबांच्या वेटिंग रूममध्ये अगोदरच खूप गर्दी होती. जिल्हाभरातून व्ही.आय.पी. तसेच समस्या घेऊन आलेले व्यक्ती भेटण्यासाठी वाट बघत होते. सर्व अधिकाऱ्यांची आतमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स चालू होती. त्यांचे स्वीयसहायक काळे साहेब यांनी सांगितले की किती वाजतील सांगता येत नाही. आत राज्यपाल महोदयांची व्ही.सी.चालू आहे. आता मात्र पंचायत झाली.सर्वांना घेऊन किती वेळ थांबावं लागणार याची कल्पना नव्हती. सर्व वेटिंग रूममध्ये बसलो.साधारणतः पाऊण तासानंतर कुमावत असा आवाज आला आणि आम्ही आनंदाने आत गेलो. कोण येणार आहेत याची नोंद ठेवणारा देवमाणूस मी त्यांच्या रुपात बघितला.आत गेल्यानंतर मी नाव सांगितले त्यांनी वेलकम करून त्यांच्या जवळच्या खुर्चीत मला बसविले.मनात धडकी भरली होती. साहेबांच्या हातात माझे पुस्तक दिले.साहेब आत बाहेर पुस्तकाची पाने उलटवू लागले.तो पर्यंत काही माणसे आत सोडली व समोरील चेअरवर बसली.त्यातली एक व्यक्ती उभी राहून साहेबांना त्यांचा पुस्तक बघतांनांचा फोटो घेण्याची विनंती इंग्लिश मध्ये बोलून करू लागली.साहेबांनी त्यांना प्रेमळ भाषेत विचारले' हू आर यु सर'
त्याच्या उत्तरानंतर साहेब येस म्हणून माझ्या पुस्तकाचे असे वर्णन करू लागले की जणू त्यांनी ते पुस्तक पूर्ण वाचले आहे.एव्हढी बुद्धिमान माणसे या जगात क्वचितच .ते इंग्रजीत संभाषण करत होते मी आणि कुटुंब मात्र अवाक झालो.साहेबांनी त्या व्यक्तीशी माझी ओळख अशी काही करून दिली की जणू आमची खूप दिवसांची मैत्री आहे असं सगळ्यांनाच वाटले असावे.मलाही त्या व्यक्ती बद्दल समोरच सांगितले की हा माणूस खूप कामाचा आहे.त्यानंतर साहेब स्वतःउठून माझ्या कुटुंबासमवेत आम्हाला फोटो दिला.इतक्या व्यस्त कामाच्या व्यापात एका प्राथमिक शिक्षकाला 10 ते 12 मिनिटे वेळ देऊन साहेब उपस्थितांसह आमच्या कायमचे हृदयात विराजमान झाले. एक हुरहूर मनात अजूनही आहे, ती व्यक्ती कोण होती जिला साहेबांनी 5 मिनिटात माझ्या संपूर्ण पुस्तकाची ओळख करून दिली. जिल्हाधिकारी मा.सुरजजी मांढरे साहेब म्हणजे अधिकारी नव्हे तर *माणसातला देव माणूस आहे हे अधोरेखित झाले. सलाम साहेब आपल्यातील दृश्य देवाला.
लेखक
अशोक कुमावत
(राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त)
9881856327





0 Comments: