डोंबिवलीत विद्यार्थ्याची आत्महत्या... आत्महत्या प्रकरणी शिक्षकाला अटक

डोंबिवलीत विद्यार्थ्याची आत्महत्या... आत्महत्या प्रकरणी शिक्षकाला अटक

 डोंबिवलीत विद्यार्थ्याची आत्महत्या... आत्महत्या प्रकरणी शिक्षकाला अटक

     डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील डीऐनसी महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आपल्या आत्महत्या केली. गणेश नगर दिवा रोड मुंब्रा येथे राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वर्गशिक्षक ओमकार भोईर याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. मुंब्रा पोलिसांनी   शिक्षकाला मंगळवारी अटक केली.त्रूशील श्रीनाथ धुमाळ ( १७ हा मुलगा डोंबिवली येथील डीऐनसी महाविद्यालयात शिकतो. त्याचे वर्गशिक्षक ओमकार भोईर ( डोंबिवली ) याने  त्रूशील याला पास करण्यासाठी १० हजाराची मागणी केली होती. पैसे न दिल्यास नापास करण्याची त्याला धमकी दिली होती.त्या तणावाखाली त्रूशील याने त्याच्या दिवा रोड येथील आपल्या राहत्या घरी सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मंगळवारी ओमकार भोईर या शिक्षकाला डोंबिवली येथून अटक केली.या प्रकरणी पोलिस निरीक्षक डी.ऐन.घुगे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

0 Comments: