ठाणे जिल्ह्यात प्रथमच डोंबिवलीतील कोपर गाव येथे महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर..          शिबिरात मोफत तपासणी आणि औषध वाटप

ठाणे जिल्ह्यात प्रथमच डोंबिवलीतील कोपर गाव येथे महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर.. शिबिरात मोफत तपासणी आणि औषध वाटप

 ठाणे जिल्ह्यात प्रथमच डोंबिवलीतील कोपर गाव येथे महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर..

        शिबिरात मोफत तपासणी आणि औषध वाटप




 डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रथमच डोंबिवलीतील कोपर गाव येथील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे प्रयत्नाने यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.महिलांमध्ये असलेली हिमोग्लोबिनची कमतरता या समस्येवर मार्गदर्शन आणि औषधोपचार या शिबिरात देण्यात आले.

    थकवा –अशक्यपणा, पायामध्ये सूज येणे,तळवे व हात थंड पडणे,चक्कर येण्यासारखे वाटणे,उलट्या होणे,त्वचा फिक्कट होणे अथवा पिवळी पडणे,धाप लागणे ,हृदयाचा ठोका वाढणे, शारीरिक क्रिया मंदावणे ह्या शरीरातील  हिमोग्लोबिन कमतरता असल्याची लक्षणे आहेत.शिबिरात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले, काही दिवसांपूर्वी कोपर येथे रक्तदान शिबीर भरविले होते. त्यावेळी काही महिला रक्तदान करण्यासाठी आल्या होत्या. मात्र हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. म्हणून मी यावर उपाययोजना करावी म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली.खासदार डॉ.शिंदे यांनी महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबीर भरविण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार शिबीर भरविले असून या शिबिरात अनेक  महिलांनी शरीरातील हिमोग्लोबिनची तपासणी करून घेतली. कोपर गावात आयोजित केलेल्या या शिबिराचा अनेक महिलांनी लाभ घेतला. अश्या प्रकारचे शिबीर सर्वांनी आयोजित केले पाहिजे असेही नगरसेवक म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.या शिबिरात शिवसेना पदाधिकारी मनोज म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे हे नेहमी आपल्या प्रभागात सामाजिक कार्य करत असून त्यांच्या कार्यावर नागरिक खुश असल्याचे दिसते.

0 Comments: