कलामहर्षी श्री . विष्णू सखाराम पाताडे यांचा जन्म वाढदिवस अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण होऊन ७६ व्या वर्षांत पदार्पण

कलामहर्षी श्री . विष्णू सखाराम पाताडे यांचा जन्म वाढदिवस अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण होऊन ७६ व्या वर्षांत पदार्पण

कलामहर्षी श्री. विष्णू सखाराम पाताडे यांचा जन्म वाढदिवस अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण होऊन ७६ व्या वर्षांत पदार्पण

वनश्री आर्ट फाऊंडेशनचे संस्थापक, कलासाधना रंगावली संस्थाचे माजी अध्यक्ष, कलामहर्षी विष्णू सखाराम पाताडे यांचा २० डिसेंबर हा जन्मदिन. आज यंदाच हे त्यांचे अमृतमहोत्सवी वर्ष. त्यांचे  कुडाळ तालुक्यातील डिगस हे मूळ गांव, सध्या भांडुप पश्चिम येथे उत्कर्षनगर येथे राहत आहेत.

           रांगोळीकार, व्यंगचित्रकार, मूर्तिकार, अभिनेता,नकलाकार अशा विविध कलागुणांनी संपन्न असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णू सखाराम पाताडे हे होय . अशा या कलामहर्षी विष्णू पाताडे यांचा आज २० डिसेंबर रोजी  वाढदिवस. यंदाच्या वाढदिवसाचे हे  ७५ वे वर्षे म्हणजेच अमृतमहोत्सवी हे वर्ष आहे.नोव्हेंबर २०१८ या वर्षात दिवाळीच्या सुट्टीत हुबेहुब भांडुप प येथिल सह्याद्री विद्या मंदिर या शाळेच्या भव्य मोठ्या एका वर्गात लालबागच्या राजाची हुबेहूब रांगोळीतुन थ्रीडी प्रतिमा साकारली होती. त्यांत त्यांचे चिरंजीव विवेक पाताडे व अन्य सहकारी यांचाही हातभार होता. लोकांना ते पाहता यावे या साठी त्यांनी प्रदर्शनाकरिता ११ दिवस ठेवले होते. यंदाही असे उपक्रम करायचे होते, पण कोरोना च्या या पाश्र्वभूमीवर शक्य झाले नाही, पण जर अजूनही शासनाच्या नियमाचे पालन करत जर शक्य झाल्यास नागरिकांना ही कला पाहण्याची संधी उपलब्ध करुन देणार आहोत. असे लोकसत्यवाणी न्युजचे संपादक संतोष गोपाळ सावंत त्यांच्याशी बोलून दाखविले आहे 

रांगोळी, व्यंगचित्र,नाट्य अभिनय  मूर्तिकला ,तसेच मराठी नाट्य संमेलनात रांगोळी प्रदर्शन महाराष्ट्र भर कलेचा प्रसार करून  मोफत प्रात्यक्षिक शिबीर आयोजित करतात, तसेच कलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून अनाथ गरिब गरजू मुलांना आर्थिक सहकार्य करतात अनेक संघटना व संस्थानी त्यांचा सत्कार केलेला आहे व अनेक पुरस्कार ही त्यांना प्राप्त झालेले आहेत, नुकताच नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेच्या वतीनेही महाराष्ट्र कलामहर्षी पुरस्कार हा त्यांना जाहीर झाला असून तो २७ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य लाभो. अमृत महोत्सवी वर्षां निमित्ताने त्यांना लोकसत्यवाणी न्युज च्या वतीने लाख लाख हार्दिक शुभेच्छा!

0 Comments: