वय वर्षे वीस, विसीतले काजरेकर सर😊
नमस्कार
आजी माजी विद्यार्थी मित्रहो, आणि गुरुजनहो,
आज मुद्धाहुन मला लिहावेसे वाटत आहे, याचे कारण ही तसेच आहे, कारण आपण सर्व जण बालपणी व तरुण्यात सायकल चालविली आहे. सायकल चालविणे ही तशी तब्येत उत्तम राखण्यासाठी चांगलीच असते, त्यामुळे एक व्यायाम होतो. दुसरा फायदा म्हणजे सद्या वाढलेले, पेट्रोलचे भाव यातूनही थोडीशी आर्थिक बचतही होऊ शकते, तिसरा फायदा वाढणारे प्रदूषण यावरही नियंत्रण ठेवता येते, असे तिहेरी फायदे सायकलचे आहेत,
मुद्यावर येतो, विशेष म्हणजे आज मी सरांच्या खुशाली साठी फोन केला होता, , सर म्हणाले नंतर फोन करतो, त्याच वेळेस गाड्यांचा आवाज! ऐकू येत होता. वेळ संध्याकळी सुमारे 7 वाजताची असावी. मला वाटले की, कदाचित सर गाडीत चढत असतील पण तसे नव्हते, तर खरे कारण वेगळेच होते, मला पुन्हा फोन आला तेव्हा सरांनी सगळा वृतांत कथन केला, म्हणाले अरे मी सायकल वर होतो. आज नवीन 13 हजार रु किंमतीची गिअरची सायकल कणकवलीत विकत घेतली. आणि ती चालवत होतो. सर म्हणाले, पंतप्रधानांचा नारा आहे. इंधन बचाओ त्याप्रमाणे आपली सुरुवात केली. त्यावेळी ते भगवती मंदिरच्या आसपास जवळ आले होते.
विशेष कौतुक आणि आनंदाची बाब म्हणजे आमचे पूजनीय गुरुवर्य मनोहर काजरेकर सरांनी आज एक नवीन गिअरची सायकल विकत घेऊन या 69 व्या वयातही 40 ते 50 किलोमीटर प्रवास कणकवली ते जांभवडे पर्यंत त्याच सायकलने प्रवासही केला, ते ऐकून मी एकदम अवाक झालो, आश्चर्यचकित झालो, मात्र माझ्या मनाला सुखद आनंदाचा धक्का बसला, कारण होते सरांच्या 69 व्या वयातल्या तारुण्याचा जोश. आजही अगदी विसीतल्या तरुणालाही लाज वाटावा तसाच जोश आहे. पूर्वी एवढीच प्रबळ शक्ती आजही त्यांच्या नसानसात आहे,
त्यांच्या या तारुण्याला अजून बहर येवो, आणि निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थन!🙏
संतोष गोपाळ सावंत 8779172824 / 9324389918
(कवी,पत्रकार लेखक)





0 Comments: