शिवसेनेच्या वतीने " कोवीड जनजागृती मँरेथाँन " २०२०

शिवसेनेच्या वतीने " कोवीड जनजागृती मँरेथाँन " २०२०

 शिवसेनेच्या वतीने " कोवीड जनजागृती मँरेथाँन " २०२०

डोंबिवली ( शंकर जाधव )  गेले ९महिने जगभरात करोनाने थैमान घातले आहे.करोनावर नियंत्रण काही प्रमाणात आलेले असले तरी ,तो पुर्ण बरा झालेला नाही. त्यासाठी जनजागृती करण्यासाठी शिवसेना डोंबिवली शहर शाखे आणि रनर्स क्लँन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मँरेथाँन " २०२० चे आयोजन रविवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली. मँरेथाँनची सुरुवात गणपती मंदिर पासून ते .अप्पा दातार चौक, ब्राह्मण सभा, लोकमान्य टिळक पुतळा, मानपाडा रस्ता , जुने शिरोडकर हाँस्पिटल, संगीता वाडी, दत्त नगर, राजाजी पथ, स्टेशन रोड, भाजी मार्केट , इंदिरा चौक, शिवसेना मध्यवर्ती शाखा समाप्त होणार आहे.ह्या जनजागृती साठी रनर्स क्लँनचे फक्त ५० धावपटू हातात कोवीड जनजागृती विषयक घोषवाक्य असलेले फलक घेउन धावणार आहेत.

0 Comments: