सत्यमेव जयते वार्ता ऑनलाइन पत्रकारिता प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

सत्यमेव जयते वार्ता ऑनलाइन पत्रकारिता प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

 सत्यमेव जयते वार्ता ऑनलाइन पत्रकारिता प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न




शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी मुबंई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी सत्यमेव जयते वार्ता ऑनलाइन पत्रकारिता प्रशिक्षण क्रमांक 2 आणि 3 शिबिराचे प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला.

या प्रमाणपत्र वितरण सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून

जेष्ठ पत्रकार लेखक साहित्यिकि मा. हेमंत देसाई सर,जेष्ठ पत्रकार व अध्यक्ष मुबंई पत्रकार संघ नरेंद्र वाभळे सर,वरीष्ठ क्राईम रिपोर्टर व उघोजक के रविदादा सत्यमेव जयते वार्ता चॅनल चे संपादक अमोल जी मडामे उपसंपादक सूरज जी भोईर, संदेश जी लालगे,रमेश जी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद हिवाळे यांनी केले.

या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विजय परब आणि त्याचे सहकारी यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाण्यावर दीपप्रज्वलन करून केले.संकल्प या संस्था कडून कुमारी दिक्षा साळूखे हिने प्रेरणादायी भाषणाने सर्वांना प्रसन्न केले.उपस्थित पाहुण्यांची परिचय प्रवीण जी दाभाडे यांनी करून दिली.कार्यक्रमाची प्रस्तावना स्मिता जी कवडे यांनी खूप छान प्रकारे मांडली.पाहुण्यांचे स्वागत फकरुद्दीन भाई आणि प्रियंका सवाखंडे यांनी केले.

सत्यमेव जयते वार्ता ऑनलाइन पत्रकारिता प्रशिक्षण क्रमांक 2 आणि 3 शिबिराचे व्याख्याते डॉ. प्रभा तिरमारे, डॉ. मधू निमकर, दयानंद जाधव सर, स्वप्नील जी वाडेकर,विनोदजी साडविलकर वर्षा ताई विद्या विलास, यांचे मोलाचे योगदान लाभले सत्यमेव जयते वार्ता टीम कडून त्यांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच या प्रशिक्षण शिबिरामधील प्रशिक्षणार्थी मोहिनी जी बागुल आणि संदीप बिराजदार यांनी खूप छान मनोगत व्यक्त केले.श्री.हेमंत देसाई सरांच्या हस्ते 70 प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सर्व उपसंपादक यांनी त्यांना देण्यात आलेल्या कार्यक्षेत्र मधील थोड्याक्यात भविष्यातील दिशा कशी असेल या संदर्भात मार्गदर्शन केले.सर्व मान्यवरांनी उपस्थिती प्रशिक्षणार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

संपादक श्री अमोल जी मडामे यांनी सत्यमेव जयते वार्ता चॅनल महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यात चॅनल च्या विस्तार करणार आहे तसेच मुबंई ठाणे या महानगरपालिका मध्ये वार्ड समिती तयार करून स्थानिक पातळीवरील प्रश्न /समस्या या वर मोठ्या प्रमाणावर चॅनल च्या माध्यमातून काम करणार आहे या संदर्भात मार्गदर्शन केले.

नवनिर्वाचित उपसंपादक आणि काही प्रशिक्षणार्थी मधील व्यक्तींना सत्यमेव जयते वार्ता चॅनेल चे प्रतिनिधी म्हणून ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.प्राजक्ता चव्हाण,प्रियंका सवाखदे सविता हेंडव्हे,मनाली इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले

कार्यक्रमाची सांगता आणि आभार प्रदर्शन संतोष जी कांबळे यांनी केले.राष्ट्रगीता कार्यक्रमाच्या शेवट करण्यात आला.




0 Comments: