डोंबिवलीत जागतिक दिव्यांगदिन मोठया उत्साहात साजरा

डोंबिवलीत जागतिक दिव्यांगदिन मोठया उत्साहात साजरा

 डोंबिवलीत जागतिक दिव्यांगदिन मोठया उत्साहात साजरा






वार्ताहर : प्रविण बेटकर

डोंबिवली (ठाणे)

जागतिक दिव्यांग दिनाचे अवचित्त साधून "विश्वधर्म अपंग मानव सेवा (रजि.)" या सामाजिक संस्थेने अपंग लोकांना संघटित करून कोरोना या महामारीचे संकट लक्षात घेऊन त्यांना एक मदतीचा हात म्हणून दिव्यांग बंधू भगिनींना धान्यवाटप तसेच गरजू व निराधार लोकांना शिधावाटप व मिठाईवाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्ह्णून मा.श्री.दिपेश म्हात्रे (नगरसेवक व माझी सभापती क.डों.म.पा.), मा.श्री.राजेश मोरे (नगरसेवक), श्री.राजू साळवे (S.E.O.) श्री.सुभाष महाजन(समाजसेवक), श्री संदेश शिरसाठ, श्री.नितीन ताणपाठक, संस्थेचे अध्यक्ष- प्रकाश भारती, उपाध्यक्ष- महेश पाटील, सचिव- गीता चव्हाण, उपसचिव- विनायक परब व राष्टीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र महासचिव तथा राज्य पी.आर.ओ. श्री.सचिनभाऊ नांगरे, डोंबिवली शहर युवा अध्यक्ष- पत्रकार श्री.प्रविण बेटकर , डोंबिवली शहर युवा उपाध्यक्ष श्री.अनिल लोंढे इतर सहकारी मित्र व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर वेगवेगळ्या विभागातून आलेल्या दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात म्हणून धान्यवाटप करण्यात आले. प्रमुख अथितींचे स्वागत करण्यात आले व त्यांचे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मार्गदर्शन झाले, अश्याच प्रकारे आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू असे माझी सभापतींनी आपल्या भाषणातून व्यक्त केले, त्यावेळी अपंग व्यक्तीच्या चेहऱयावरील आनंद बघण्याजोगे होता व अश्याप्रकारे आनंदमय वातावरणात सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments: