माजी सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या घरी दत्तजयंती साजरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीजवळील खोणी गावात माजी सरपंच हनुमान ठोंबरे यांच्या नवनाथ श्री कृपा बंगल्यात सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी झाली.सकाळी १० वाजता मूर्ती अभिषेक व पूजा , सकाळी ११ वाजता गावदेवी भजन मंडळ ( आंबेशिव ), सायंकाळी ६ वाजता रामाणाचार्य ह.भ.प.विश्वनाथ महाराज वारिंगे ( पाले ) रात्री ८ वाजतां शिवशक्ती म्युझिकल ग्रुप ( कर्जत – वर्णे ) असा कार्यक्रम होता.यावेळी श्री उत्तरराव केदार महाराज व रामाणाचार्य ह.भ.प.विश्वनाथ महाराज वारिंगे ( पाले ) यांचा आशीर्वाद लाभला. माजी सरपंच हनुमान ठोंबरे यांच्य नवनाथ श्री कृपा बंगल्यात साजरा झालेल्या दत्तजयंतीत अनेक भाविकांनी श्री दत्ताचे दर्शन घेतले.दरवर्षी होणाऱ्या दत्तजयंती बंगल्यात भाविकांची गर्दी वाढत असते.यावेळी माजी सरपंच हनुमान ठोंबरे आणि कुटुंबीयांनी जगातून कोरोनाचे संकट दूर होऊ दे, सर्वाना सुखी-समाधानी ठेव अशी देवाकडे प्रार्थना केली.





0 Comments: