मराठी भाषा संवर्धन समिती उद्घाटन व इ ८ वी इ-पुस्तक प्रकाशन सोहळा
अहवाल
१२ जानेवारी विश्व शिक्षिका राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून इ-८वी इ-पुस्तक प्रकाशन व मराठी भाषा संवर्धन समिती उद्घाटन सोहळा झूम माध्यमातून ऑनलाईन पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सौ सुनिता गोळे यांच्या ईशस्तवनाने झाली.श्री वाघमारे सरांनी स॔वादिनीवर सुमधूर स्वागतगीत सादर करून सूर सुमनांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.. कु श्रेया पन्हाळकर ,आशी र्कांबळे, ओंकार चौगुले या विद्यार्थ्यांनी छोटेखानी सादरीकरणातून स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीस अभिवादन केले.
सौ.शलाका काळकर यांनी प्रास्ताविकात ८वी ई पुस्तक निर्मिती मागील कारणाचा मागोवा घेतला व मराठी भाषा संवर्धन समितीची उद्दीष्टे आणि हेतू सर्वांसमोर मांडली. ही समिती विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षण प्रेमी यांच्या साठी व त्यांच्याच सहभागाने कार्य करेल हे आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी डाॅ.श्री.मुस्ताक शेख, शिक्षण निरीक्षक,उत्तर विभाग हे लाभले होते. त्यांचा परिचय सौ ,संगीता पाटील यांनी ओघवत्या भाषेत करून दिला. त्यानंतर शेख साहेबांच्या हस्ते ८वी इ पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाईन करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व अश्या नवीन उपक्रमात कसलीही गरज लागल्यास मदतीचे आश्वासन दिले.
मराठी भाषा संवर्धन समितीचे उद्घाटन सौ प्राची साठे यांच्या हस्ते झाले ,त्याच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा परिचय सौ मृणाल इंदप यांनी करून दिला. याप्रसंगी साठे मॅडमनी समितीच्या नवीन उपक्रमांचे कौतुक केल व या कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्याचे वचन दिले. त्यांनी त्याच्या ओघवत्या भाषेत विचार केल्यास आपोआप शब्द सुचतात हे विवेकानंदांच्या गोष्टीतून समजावून सांगितले.
सौ नंदा भोर या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यास आवर्जून उपस्थित होत्या त्यांचा सौ संगीता देशमुख यांनी परिचय करून दिला. भोर मॅडमनी शिक्षकाने सतत उपक्रमशील राहिले पाहिजे हे सांगून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी ८वी इ- पुस्तक निर्मितीत सहभागी झालेले श्री संजय गवांदे व सौ रंजना वडेकर यांनी आपले प्रतिनिधिक मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक एनापुरे हे नेटवर्क समस्येमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत.पण त्याचा परिचय करून देताना सौ संगीता पाताडे यांनी त्याच्या शुभेच्छा कळवल्या व इ,८वी पुस्तकातील त्यांनी लिहिलेल्या कॅप्टन राधिका मेनन या पाठामागील भावनाही व्यक्त केल्या.
सौ सुनिता गोळे यांनी स॔पूर्ण कार्यक्रम सुंदर सूत्रसंचालनातून एकत्र गुंफून ठेवला.
या कार्यक्रमास आवर्जून श्री चिंदरकर सर,गाडेसर, कुसाळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप सुर्वे सरांच्या काव्यमय आभार प्रदर्शनाने झाला.





0 Comments: