हस्तकलेतून मुलांना कलाकुसरीचे धडे
मुंबई : (प्रतिनिधी ) हस्तकलेतून मुलांना कलाकुसरीच्या धडे देणारा भांडुपचा नामवंत कागदी शिल्पकार श्री चंद्रशेखर घरत वयाच्या 15 वर्षापासून आपली कला समाजासमोर सादर करत आहेत कागदापासून देश विदेशातले पक्षी, प्राणी ,फुले व इतर वस्तू तयार करून समाजातल्या मुलांना या कलेचे धडे देऊन त्यांच्यासारखेच कागदी शिल्पकार घडवण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या या कला उपयोगी कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे मुंबईतच नव्हे तर मुंबई ठाणे डहाणू आणि पालघर सारख्या आदिवासी भागात आपली ही कला पोहोचवली आहे
श्री चंद्रशेखर घरात मुंबईतल्या सँडहर्स्ट रोड रोड येथे जन्माला आले होते. मुंबई बेस्ट परिवहन सेवेत कार्यरत होते आता या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ या छंदासाठी जोपासला आहे. कागदापासून अगदी हुबेहूब दिसणारे पक्षी ,फुले, प्राणी, घर आणि बंगल्याचे मॉडेल देखील तयार करत आहेत इतकेच नव्हे तर सार्वजनिक गणेशोत्सव ,नवरात्र उत्सवात ही आपली कला सादर करताना दिसतात
लहानपणी त्यांच्या कागदापासून होडी बनवताना पाहून त्यांना या कागदी खाण्याची आवड निर्माण झाली आपल्या आईपासून प्रेरणा घेऊन त्यांनी जवळजवळ 40 वर्षांहून अधिक काळापासून कागदापासून विविध वस्तू शिल्प तयार करण्यात ते तरबेज आहेत सुरुवातीपासून कागदाचा वापर करत देश-विदेशातील हुबेहूब पक्षी ,फुले ,वस्तू बनवत बनवत आज पशु प्राण्यांचे कागदी शिल्पहि ते बनवतात इतकंच नव्हे तर आर्किटेक महाविद्यालईन मुलांना कागदापासून विविध प्रोजेक्ट बनवायलाही ते मदत करतात आजवर त्यांनी भांडुप मधील नामवंत संस्था मंडळ यांच्या सहकार्याने कार्यशाळा घेऊन त्यांनी नवीन कागदी शिल्पकार घडवायला सुरुवात केली आहे आता ते भांडुप मधील कलाकारांची एक नामवंत संस्था अखिल भांडुप कलाकारकट्टा या संस्थेचे सभासद आहेत लवकरच या संस्थेच्या सहकार्याने ते भांडुप मध्ये भांडुपमधील तरुण वर्गासाठी कार्यशाळा घेऊन कागदापासून विविध शिल्प बनवण्याची कला भांडुप कलाकारांसाठी घेऊन येत आहेत





0 Comments: