डोंबिवलीतील पुसाळकर उद्यानात माणुसकीची भिंत

डोंबिवलीतील पुसाळकर उद्यानात माणुसकीची भिंत

 डोंबिवलीतील पुसाळकर उद्यानात माणुसकीची भिंत

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि इनरव्हील कल्ब आँफ डोंबिवली ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीच्या पुसाळकर उद्यानात माणुसकीची भिंत साकारली आली. `माणुसकीची भिंत`वर कडप्याचे आखीव कप्पे बसविण्यात आले आहेत. यामध्ये जुने पण चांगल्या स्थितीतील कपडे. साड्या. चादरी. सतरंज्या. खेळणी. आणि नित्यपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. माणुसकीच्या भिंतीच्या उदघाटन समारंभास घनकचरा आयुक्त रामदास कोकरे, उपायुक्त सुर्यकांत जगताप,`ग`प्रभाग श्रेत्र आधिकारी, स्नेहा करपे उप अभियंता रोहिणी लोकरे.``प्रभाग श्रेत्र आधिकारी राजेश सावंत,चीफ सँनिटरी इन्स्पेक्टर धोत्रे व जगताप आणि इनरव्हील कल्बच्या अध्यक्ष अश्विनी जसेक्रेटरी मानसी वैद्यशर्वरी केतकर,शोभा जावकर,प्रीती तांबट, पूनम बोबडे, मीना गोडखिंडी या इनरव्हील सभासद उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी कल्बच्या उपाध्यक्ष रोहिणी लोकरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी कल्बतर्फे उपस्थितांना असे आवाहन करण्यात आले की,आपल्या घरातील जुन्या पण सुस्थितीमधील स्वच्छ वस्तू या भिंतीवर ठेवाव्यात. यावेळी अनेकांनी वस्तू आणून ठेवल्या होत्या.. भोगी व संक्रांतीचे औचित्य साधून हा समाजदानयज्ञ  सातत्याने चालू राहणार आहे..।यावेळी उपस्थित मान्यवरांना कोविड मर्दिनी या दिनदर्शिका देण्यात आल्या.. आभार प्रदर्शनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments: