पुर्नवसनाबाबत चर्चा करूनच रस्तारुंदीकरण करण्याचे पालिका आयुक्तांचे आश्वासन...

पुर्नवसनाबाबत चर्चा करूनच रस्तारुंदीकरण करण्याचे पालिका आयुक्तांचे आश्वासन...

 पुर्नवसनाबाबत चर्चा करूनच रस्तारुंदीकरण करण्याचे पालिका आयुक्तांचे आश्वासन...

 डोंबिवली शंकर जाधव ) डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपुलाचे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी  महापालिकेने टंडन रोड ते राजाजी पथ  परिसरातील  रस्ता रुंदीकरण होणार आहे.रस्ता रुंदीकरणात अनेक इमारतीचा काही भाग तर आदर्शनगर झोपडपट्टीवर पालिकेचा हतोडा पडणार आहे.पालिकेची हि कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक मंदार हळबे आणि स्थानिक रहिवाशी हे काम सुरू असलेल्या पुलाच्याजवळ बुधवारी साखळी उपोषणास बसले होते.या उपोषणाची पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दाखल घेत उपोषणकर्त्यांना चर्चा करणासाठी कार्यालयात बोलावले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी मनसेचे स्थानिक नगरसेवक मंदार हळबे आणि प्रकल्पबाधितांनी पालिका आयुक्तांनी चर्चा केली.या चर्चेत नगरसेवक हळबे यांनी प्रकल्पबधीतांचे म्हणणे आयुक्तांसमोर मांडले. चर्चा झाल्यावर पुर्नवसनाबाबत चर्चा करूनच रस्तारुंदीकरण करणार असे आश्वासन पालिका आयुक्तांनी माजी नगरसेवक हळबे आणि प्रक्ल्पबाधितांन दिले. पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने प्रकल्पबाधितांनी प्रशासनाचे आणि नागरिकांच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल माजी नगरसेवक हळबे यांचे आभार मानले.


0 Comments: