रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील रस्तावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक करण्यासाठी आलेल्या पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील आरोग्य निरीक्षक व कर्मचारी वर्ग आले होते. कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करतान त्यांना रस्त्यावर कचरा टाकू नका अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा द्या असे यावेळी उपस्थित असलेले डोंबिवली शहर सचिव प्रीतेश म्हामुणकर यासंह मनसैनिक गरुड म्हात्रे यांनी कारवाई करण्यासाठी आलेल्या आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना विनंती केली.त्याप्रमाणे आरोग्य निरीक्षक यादवगायकवाड मुकादम खंदारे यांनी मनसैनिकांच्या विनंतीला मान देत नागरिकांना रस्तावर कचरा टाकू नका असे सांगितले. रेती बंदर रोडवर दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी आठवडा बाजार भरतो.यावेळी रेती बंदर रोडवर रस्त्याच्या कडेला कचरा साचतो. तर सायंकाळी ७ नंतर अनेक काही नागरीक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराई होण्याची शक्यता आहे.रेती बंदर रोडवर दिवसातून दोन वेळा घंटागाडी येत असते. ओला-सुका कचरा वर्गीकरण करूनच कचरा घंटागाडी टाकावा असे घनकचरा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. तरीही काही नागरीक याकडे दुर्लक्ष करत रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. मनसे नगरसेवक प्रकाश भोईर व सरोज भोईर यांसह संदीप ( रमा ) म्हात्रे यांसह मनसैनिकांनी `कचराकुंडी मुक्त प्रभाग`करण्यासाठी जनजागृती सुरु केली आहे याला प्रतिसाद मिळत आहे. रेती बंदर रोडवर कचरा टाकला जात असलेल्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा करावा अशी मागणी होत आहे.

 

 

 

0 Comments: