मा.वि नाटळ हायस्कुल ची शिक्षिका राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी श्रीमती प्रणिता उल्हास बांबुळकर यांची निवड

मा.वि नाटळ हायस्कुल ची शिक्षिका राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी श्रीमती प्रणिता उल्हास बांबुळकर यांची निवड

मा.वि नाटळ हायस्कुल ची शिक्षिका राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी श्रीमती प्रणिता उल्हास बांबुळकर यांची निवड

                    महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने सन 2020 - 21 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी माध्यमिक विद्यालय नाटळ, कणकवली या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. प्रणिता उल्हास बांबुळकर यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.प्राथमिक - माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच अधिकारीवर्ग यांच्यासाठी जिल्हास्तरीय ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

               या स्पर्धेसाठी प्राथमिक विभागातून 37 व माध्यमिक विभागातून 8 शिक्षकांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. जिल्हास्तरावर या स्पर्धेसाठी प्रत्येक गटातून प्रत्येकी सात शिक्षकांची निवड करण्यात आली होती. प्रथम फेरीमध्ये अहवाल लेखन आणि द्वितीय फेरीमध्ये नवोपक्रमाचे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. जिल्हास्तरावर आलेल्या प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रत्येकी पाच शिक्षकांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.पी. व्ही.जाधव यांनी दिली. या स्पर्धेत माध्यमिक गटातून श्रीम. प्रणिता उल्हास बांबुळकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

              या स्पर्धेसाठी माध्यमिक विद्यालय नाटळच्या विज्ञान शिक्षिका श्रीम.प्रणिता उल्हास बांबुळकर यांनी " मैत्री करुया मूलद्रव्यांशी " हा नवोपक्रम सादर केला होता. विज्ञानातील क्लिष्ट  वाटणारी मूलद्रव्ये व त्यांचा अभ्यास मुलांना सहज सोपा वाटण्याच्या दृष्टीने, गेल्या वर्षीपासून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम त्यांनी शाळेत राबविला. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्व -निर्मितीतून आवर्त सारणी तयार करून, त्यावर आधारित मूलद्रव्यांच्या नावाने हजेरी,  मूलद्रव्यांचे आत्मकथन, मूलद्रव्यांवर आधारित कथाकथन, गुणात्मक वाढीसाठी मूलद्रव्यांवर आधारित प्रश्नमंजूषा इत्यादी विविध उपक्रमांमध्ये  उत्स्फूर्त सहभाग घेऊन, विद्यार्थ्यांनी मूलद्रव्यांशी घट्ट मैत्री केली आणि  हा क्लिष्ट वाटणारा भाग सहजसोप्या आनंदादायी पद्धतीने आत्मसात केला.

           या उपक्रमासाठी  श्रीम. बांबुळकर यांना राजवाडी उत्कर्ष मंडळ, मुंबई संचलित. संस्था पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देसाई व सहकारी शिक्षक तसेच डाएट चे प्राचार्य पी. व्ही.जाधव,अधिव्याख्याता डॉ. लवू  आचरेकर,महेश गावडे, विषय तज्ञ सचिन तांबे यांचे  वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

           राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने सर्व संस्था पदाधिकारी ,मुख्याध्यापक,तसेच शालेय समिती चेअरमन एस.जी.सावंत आणि सहकारी शिक्षक- शिक्षकेतर वृंदाने श्रीम. प्रणिता उल्हास बांबुळकर यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments: