राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा राज्यमंत्र्यांच्या शुभहस्ते डोंबिवलीत संपन्न

राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा राज्यमंत्र्यांच्या शुभहस्ते डोंबिवलीत संपन्न

 राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा राज्यमंत्र्यांच्या शुभहस्ते डोंबिवलीत संपन्न

महाराष्ट्रात कोकण म्हटले की, मला कोकण वासीयांबद्दल सार्थ अभिमान वाटतो असं म्हणणार्‍या राज्यमंत्री- मान. आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते नवचैतन्य सामाजिक विकास संस्था (रजि.) व संतोष प्रकाशन यांच्या विद्यमाने सन २०२० राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी, संस्थापक/संचालक - मान.हरिसंतोषजी आणि शेकडोची उपस्थिती वंदनीय असून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे विविध विभागातील पुरस्कार करण्यात आले.

कोकणातला माणूस म्हटले की जणू "कोहिनूर हिराच"! मुंबई-गोवा महामार्गावरील पाली नजीक वसलेल्या असोडे (लांजा) गावातील पत्रकार- प्रविण नावजी बेटकर यांना राज्यमंत्री मान. आमदार रविंद्रजी चव्हाण साहेब  यांच्या हस्ते "नवचैतन्य महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार" व "सन्मानचिन्ह" देऊन गौरविण्यात आले. गावाकडे शिक्षण पूर्ण करून आलेल्या पत्रकार प्रविण बेटकर यांनी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातही आपली यशस्वीपणे सुरुवात केली. अतिशय नाजूक परिस्थितीत १३ कि.मी. पायपीठ करून शिक्षण घेतलेल्या प्रविणने आपली स्वप्न पूर्ण करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. प्रविणने माझे वडील आणि  बेटकर बंधू यांचा आदर्श समोर ठेऊन कामगिरी करीत असल्याचे स्पष्टपणे व्यक्त केले. आम्ही कुटुंबीयांनी काढलेल्या परिस्थितिची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यानुसार मी विचारपूर्वक पाऊल उचलुन समाज्यात वावरतो असे बोलून आई-वडिलांच्या मेहनतीची दखल घेत मी माझ्या कुटूंबियांचे प्रेम घेऊन जबाबदारी म्हणून समाजकार्यात स्वतःला झोकून दिले असल्याचे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

0 Comments: