विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांचा दुदैवी अंत
सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील अरूणा प्रकल्पातील प्रकल्प ग्रस्त शांताराम नागप यांची भूखंडाची ताबा पावती न मिळाल्याने बुडीत क्षेत्रात गेलेले नवीन घर,जमीन झाडांचे योग्य मूल्यांकन केलेले नसल्यामुळे नैराश्यातून अरुणा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शांताराम विठ्ठल नागप यांनी 6 जानेवारी 2021 रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता .सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा येथील उपचारानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत असताना अरुणा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त बुधवार दिनांक १३ जानेवारी रोजी शांताराम विठ्ठल नागप यांची सायंकाळी ७ वाजता अखेर प्राणज्योत मालवली.
या घटनेने अरुणा प्रकल्पग्रस्तांनमध्ये हळहळ व संताप व्यक्त करण्यात येत आहे
शांताराम नागप यांनी 6 जानेवारी रोजी मांगवली पुनर्वसन गावठाण येथे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना तातडीने वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते वैभववाडी पोलिसांनी त्यांची जबानीही घेतलेली आहे आपल्या घराची ताबा पावती नसल्याने तसेच अन्य नैराश्यातून आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे पिडीत शांताराम गोपाळ नागप यानी पोलिसांना जबाब दिले आहेत या जबाबा नंतर कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी वैभववाडी पोलिसांची भेट घेतली होती परंतु आठवडाभर हे प्रकरण पोलिस आणि राजन डवरी यांनी मीडिया पर्यंत पोहचू दिली नव्हती. आठवडाभरानंतर हे प्रकरण समाज माध्यमांपर्यंत आले, हे प्रकरण आपल्या अंगलट येणार याची खात्री झाल्यानंतर कार्यकारी अभियंता राजन डवरी व गावातील तथाकथित दलाल पुढाऱ्यांच्या मदतीने गेले पाच-सात दिवस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत
कोकणात कितीही निसर्ग संकटे आली तरी शेतकरी आत्महत्या करत नाही हे शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य आहे दुर्दैवाने अरुण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शांताराम गोपाळ नागप यांनी आत्महत्या सारखा पर्याय शोधला त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने केवळ सिंधुदुर्गात नव्हे तर अवघ्या कोकणात खळबळ माजली आहे.




0 Comments: