रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानामुळे प्रवाश्याला मिळाली बॅग
डोंबिवली (शंकर जाधव ) ९.२५ च्या छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकलमध्ये प्रवास करत असताना एका महिला प्रवाश्याची बॅग डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर पडली.डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे जवान लालाराम मीणा यांनी फलाटावर पडलेली बॅग रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणली.काही वेळाने या बॅगेतील मोबाईल फोनवर कॉलवर आल्यावर सुरक्षा रक्षक हरफुल सिंह यादव यांनी प्रवासी महिलेला बॅग डोंबिवली सुरक्षा बलाच्या कार्यालयात असल्याचे सांगितले.डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा येथील रहिवाशी महिलेने बॅगेत आपलीच असल्याचे त्यांना सांगितले. बॅगेत एक मोबाईल आणि ७०० रुपये होते. आपली बॅग परत मिळवून दिल्याबद्दल महिलेने डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले.





रेल्वे पोलिसांचे अभिनंदन
ReplyDelete