परशुराम नेहे एक दिलखुलास व्यक्तिमत्व
(परशुराम नेहे यांच्या ७ जानेवारी रोजीच्या वाढदिवसनिमित्त हा लेख )
अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात सावरगाव पाट या ग्रामीण भागातील खेडेगावात अतिशय गरीब कुटुंबात यांचा जन्म झाला.. आज ठाणे कोपरी पोलिस स्टेशन तर्फे सन्मान तसेच सत्कार करण्यात आला.
परिस्थितीमुळे त्याने म्हणावं तसं उच्च शिक्षण घेता आले नाही...पण घरच्या परिस्थिती बद्दल एक अवाक्षर न काढता त्यावर मात करीत त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि छोटे मोठे काम मिळेल म्हणून मुंबईचा रस्ता पकडला मुंबईत जसे यूपी बिहामधून माणसं येतात आणि आपली भूक भागवितात, मग मुंबई आपल्याला का दूर करील..अशी मनात जिद्द असली की माणसाला काही कमी पडत नाही..
सावरगाव पाट चे भूमिपुत्र परशुरामन नेहे हे असले तरी त्यांची कर्मभूमी ठाणे आहे. म्हणजे मुंबईत आल्यावर त्यांना सुरुवातीला चॅम्पियन एव्हरग्रीन कंपनीत काम मिळवले..मेहनत करण्याच्या तयारीनेच आले म्हटल्यावर तेथे काही दिवस काम केल्यानंतर हरबर्टसन्स लिमिटेड या कंपनीमध्ये ते कामाला लागले..कामाचा अनुभव वाढत गेला. येथे थोडे दिवस काम केल्यानंतर क्रॉम्प्टन ग्रीव्हज मध्ये रुजू झाले.. आणि नेहे यांचे भाग्य उजळले त्याच्याकडे असलेल्या गुणांचे कौतुक तर झालेच पण त्याच बरोबर अनेक मान सन्मान प्राप्त झाले..त्यामुळे तिथेच स्थिरावले..
घरात वारकरी संप्रदायाचे परंपरा असल्याने समाज प्रबोधन व समाजसेवेची बालपणापासून आवड होती हे अंगभूत गुण त्यांच्या अंगी तर होतेच त्यामुळे आयुष्यात आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं..कॉम्टन ग्रीव्ह्जमध्ये काम करत असताना... साहित्य सहकार कामगार अशा विविध क्षेत्रात त्यांना सन्मान प्राप्त झाला संस्कार व अध्यात्मशास्त्र या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले..पुढे पुढे तर संपूर्ण कंपनीमधील गुणवत्ता व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षितता नेतृत्व विकास कामगार प्रशिक्षण त्या कार्यक्रमाच्या संयोजनात ते आग्रही सहभाग होत असत..साहित्याची आवड तर त्यांना अधिपडून होतीच ...त्यांनी लिहिलेल्या लेखनाला कामगार साहित्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सध्या परशुराम नेहे हे सेवानिवृत्त आहेत तरी समाजसेवेची आवड थांबली नाही... अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस म्हणून ते काम पाहत आहेत हा कवी मनाचा माणूस सामाजिक परिवर्तनाच्या मोहिमेत सतत कार्यरत असतो...यांना गुणवंत कामगार ठाणे, गुणीजन साहित्य मानव सेवा पुरस्कार, आणि कामगार प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात सावरगाव पाट येथे जन्म झालेल्या परशुराम नेहे यांनी साहित्य क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली..अशा सुप्रसिद्ध कवी परशुराम नेहे यांना नुकताच अहमदनगर येथे जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अहिल्याबाई होळकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला यानिमित्ताने माझे दोन शब्द..येथे देत आहे..
त्यांच्या साहित्य लेखन आणि घोषवाक्य ना ही पुरस्कार मिळाले आहेत नानाविध विषयांवर त्यांनी कविता करून आकाशवाणी वरील कामगार सभा या कार्यक्रमात त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे...या राष्ट्रीय कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे नेतृत्व ही केले..
परशुराम नेहे हे अनेक साहित्य संस्थांमधून कविता सादरीकरण करीत असतात.. आपोआपच समाजप्रबोधन होते..ठाण्यातील नीलपुष्प साहित्य मंडळाच्या व्यासपीठावर असे काम करताना मी त्यांना बरेच वेळा पाहिले आहे..लहान असो की मोठं सर्वाना आदराने आणि सन्मानाने वागवतात....सामाजिक काम करण्याच्या सवयीमुळे त्यांनी आपल्या मूळगावी माध्यमिक विद्यालय सुरू करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे..गावात सुंदर वाचनालय सुरू करून शिक्षणाचा झरा ग्रामीण भागातही नेला आहे.. या कामाची दखल घेऊन त्यांना राज्य सरकारने गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.. तसेच ठाणे गुणीजन कामगार भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा या अष्टपैलू परशुराम नेहे मिळालेला पुरस्कार आम्हा साहित्यिक मंडळींचा बहुमान आहे..त्यामुळे हीअतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे..
परशुराम नेहे यांच्या साधेपणातच त्यांचे मोठेपणा आहे, बोलण्यात नम्रता आणि वागण्यात सौजन्य असल्याने, हृदयात प्रेमाचा आणि स्नेहाचा झरा आहे...
शब्दांकन-
राजेश साबळे,ओतूरकर
कवी/लेखक
अध्यक्ष-ठाणे जिल्हा काव्यप्रेमी शिक्षक मंच (रजि) महाराष्ट्र खजिनदार.निलपुष्प साहित्य मंडळ, ठाणे.






0 Comments: