निमा आणि आयुष संघटनेच्या एकही डॉक्टरला लसीकरणासाठी आमंत्रण नाही

निमा आणि आयुष संघटनेच्या एकही डॉक्टरला लसीकरणासाठी आमंत्रण नाही

  निमा आणि आयुष संघटनेच्या एकही डॉक्टरला लसीकरणासाठी आमंत्रण नाही

     

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात देशातील प्रत्येक डॉक्टर्सने दिवसरात्र ए कडून रुग्णांचे प्राण वाचवले.या कोरोना योद्धांना लसीकरणासाठी आमंत्रण देणे प्रशासनाचे काम होते.केडीएमसिने लसीकरणासाठी कल्याण डोंबिवली शहरात आयएमएच्या डॉक्टराना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र निमा आणि आयुष संघटनेच्या एकही डॉक्टरला लसीकरणाच्या उद्घाटनाचे किंवा लसीकरणासाठी आमंत्रण देण्यात नाही. या दुजाभाव प्रशासनाने का केला असा प्रश्न निमाने उपस्थित केला आहे. याबाबत निमाचे अध्यक्ष डॉ अनिल पाटील यांना विचारले असता त्यांनी लसीकरण उद्घाटन सोहळ्याला आपल्या संघटनेतील कोणालाही बोलावण्यात आले नाही. याबाबत आपण डॉ अश्विनी पाटील यांना जाब विचारला असता त्यांनी कोविन अॅपचे कारण सांगितले. तसेच ६ हजार आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार असून यात संघटनेतील काही जणांची नावे असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात आपल्या संघटनेतील डॉक्टरांना पहिल्या यादीत घेतले आहे किंवा नाही याची आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. कोरोना काळात पालिकेच्या आरोग्य सुविधाबरोबर असल्यामुळे खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्या बरोबरच शहरात प्रक्टीस करणारया आयएमए,निमा,आयुष या डॉक्टराच्या संघटनाना मदतीला येण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. शहराती प्रत्येक डॉक्टर खाजगी डॉक्टर कोरोनायोद्धा  आहे.शनिवारी कल्याण डोंबिवली मधील तीन केंद्रावर लसीकरण मोहिमेचा सुरुवात झाली या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केवळ आयएमएच्या डॉक्टरानाच आमंत्रण दिले. मात्र निमा आणि आयुष संघटनेच्या अध्यक्षांना देखील या सोहळ्याला आमंत्रित नसल्यामुळे या संघटनेच्या पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली.याप्रकरणी पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्यांना जाब विचारला मात्र कोविन अप मध्ये बिघाड झाल्याने आपण फोन वरून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याने गोंधळ झाल्याचे सांगत आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनी पालिकेच्या सापत्य वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

 

0 Comments: