स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या चर्चेसाठी शिवसेना शहरप्रमुखाचे दुर्लक्ष ...काँग्रेसचा आरोप....चर्चेसाठी काँग्रेसकडून प्रयत्न नसल्याचे शिवसेना शहरप्रमुखाचे उत्तर ..
डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्रात प्रथमच शिवसेनेने भाजपला दूर करून दरवेळी टीका करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी ला हाताशी घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. स्थानिक निवडणुकीत सुद्धा हीच आघाडी कायम राहावी म्हणून काँग्रेसने शिवसेनेकडे चर्चेसाठी हात पुढे केला मात्र डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी चर्चेसाठी टाळाटाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांनी केला आहे. तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होण्यासंदर्भात काँग्रेसने आमच्याशी संपर्क साधला नसल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी करताना शिवसेनेने काँगेसला सन्मान देत जागावाटपासाठी सकारात्मक भूमिका घेतली तर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात 'डोंबिवली पॅटर्न' आदर्श ठरेल असा विसश्वास संतोष केणे यांनी व्यक्त केला. परंतु ज्या प्रमाणे ऐका हाताने टाळी वाजत नाही. त्याप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र येऊन महापालिकेचा महाविकास घडवण्यासाठी काँग्रेस अग्रेसर आहे. परंतु सत्तेच्या गणितात आपले पारडे जड असल्याचे शिवसेनेला माहीत असल्याने सुरुवातीची चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही. आगामी निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली तरी एक हाती सत्ता येणे हे तितके सोपे नाही. याचे कारण भाजप आणि मनसे यांची छुपी युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यास विरोधक नक्कीच प्रयत्नशील राहतील.काँग्रेसने आपला हात पुढे केला आला तरी शिवसेना चर्चेसाठी पुढे आली नाही असा काँग्रेसचे संतोष केणे यांनी केला.यावर डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असला तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीबाबतचा निर्णय पक्षप्रमुख आणि वरिष्ठांकडून घेतला जाईल.परंतु काँग्रेसने मला यासंदर्भात संपर्कच केला नाही असे सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी बाबत शिवसेनेचे सत्ता केंद्र ठाण्यात असून याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी स्थानिक पातळीवर शहर प्रमुखांकडून चर्चेला पाठ फिरवल्याचा कॉंग्रेसच्या आरोपावर शिवसेना कोणते उत्तर देईल हे लवकरच दिसून येईल.




0 Comments: