कविता: मालक आम्ही ह्या देशांचे
क्रांतिकारका महानायका
ह्या देशाच्या मुळं मालका
इतिहास तुझा जान तू खरा
तुझी सत्ता हिंसकावली विरा ||धृ||
शासक करति तूझी जमात
गेला कसा रे तू रानात
फक्त जंगलाचा नाही तू राजा
तुला ठेवले आहे भ्रमात
शिक्षणा पासून वंचित तू
म्हणून मुखलास रे आधिकारा ||१||
शूर विरांचा तूझा वारसा
तू घाबरून राहातोस कसा
एकलव्य तू होऊ नको
घात मनू वाधी करतील तूझा
फंडात त्यांच्या पडू नको रे
जाणून घे इतिहास सारा ||२||
कपट नितीने केले वार
असा केला तूझा संगार
पूर्वज होते तुझे जिद्दी फार
घेतली नाही नरेश माघार
वनवासी तू मूळ निवासी
तू कायम स्वतंत्र विचारा ||३||
- कवी नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो:- ७५१७३८९७४६




0 Comments: