कविता : तक्रार कोणती नाही

कविता : तक्रार कोणती नाही

 कविता : तक्रार कोणती नाही

                          

                                                                 विजो (विजय जोशी)

    

मी कंपू केला नाही

मी जमाव नेला नाही

पण न्यायासाठी लढलो

कधि हार मानली नाही


मी नियम मोडला नाही

की नियम जोडला नाही

मी परिस्थितीशी जुळलो

परि शिस्त मोडली नाही


मी या कंपूचा नाही

की ना त्या कंपूचाही

मन मुक्त श्वास मी जगलो

परिघात अडकलो नाही


मी कॉपी केली नाही

वा चोरी सुद्धा नाही

शब्दांशी खेळत गेलो

मी कविता केली नाही


दारूला शिवलो नाही

सिगरेट ओढली नाही

काव्यात गुंतुनी गेलो

व्यसनात अडकलो नाही


मी मंदिर गेलो नाही

उपवासहि केला नाही

की स्वार्थासाठी कोठे

मी नवस बोललो नाही


मी सुखात फुगलो नाही

दुःखाने खचलो नाही

मी आनंदाने जगलो

तक्रार कोणती नाही


■■■

© विजो

विजय जोशी

डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)

९८९२७५२२४२

0 Comments: