जनादेश वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाचे आयोजन
(मुंबई- प्रतिनिधी ) : जनादेश वृत्तवाहिनी या स्थानिक वृत्तवाहिनी चा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी ,कुर्ला नेहरूनगर येथील माननीय बाळासाहेब ठाकरे समाज केंद्र कुर्ला पूर्व येथे संपन्न होणार आहे . सदर वर्धापन दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद लोकशाही चॅनलच्या अँकर आणि सीनियर प्रोडूसर माननीय सौ. मनुश्री पाटील भूषवणार आहेत .तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सन्मानीय पाहुणे म्हणून मुंबई काँग्रेसचे प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे. अँटी करप्शन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रबिंद्र द्विवेदी, शिवकेबल सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री विनय(राजू) पाटील, राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब आवचरे, उद्योजक श्री .अब्दुलरहीम खान उपस्थित राहणार आहेत. जनादेश वृत्तवाहिनीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा सामाजिक पुरस्कार यंदा विद्यावर्धिनी संस्था दारावे, नेरूळ, नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बाळाराम पाटील तर क्रीडा पुरस्कार आंतरराष्ट्रीय तायकांडो प्रशिक्षक श्री जयेश वेल्हाळ यांना देण्यात येणार असल्याची माहिती जनादेश वृत्तवाहिनीचे संपादक श्री सुरेश पाटील यांनी दिली आहे




0 Comments: