तुझ्या ज्ञान तेजाने
तुझ्या ज्ञान तेजाने तळपत आहेत सहस्त्र ज्योती
वर्णावी तुझी त्यागमय जीवन कथेची महती किती...!!
पती ज्योतीबा फुलेंनी दिली हाती तुझ्या लेखणी
भूमीवरी गिरविलीस मुळाक्षरांची उजळणी किती...!!
सक्षम केले ज्योतीबाने योग्य तुला शिकविण्यास
सोपविल्या असहाय्य माता भगिनींना तुझ्याकडे शिकण्यास...!!
न डगमगता धीराने तू ही पेलले ते अजस्त्र धेय्य
शिकविण्यास केलास प्रारंभ ज्या होत्या असहाय्य...!!
आली किती संकटे किंतु तू डगमगली नाहीस तसूभर
दिलास धडा शिकण्याचा अबलेला खंबीरपणे लढून त्या दुष्ट कर्मठांबरोबर...!!
आजची स्री झाली सक्षम माते ज्योती तुझ्यामुळे
शूरवीर, रणरागिणी ठरली ती ज्योती तुझ्यामुळे...!!
रचनाकार ©️®️ 🖋️ सरस्वतीपुत्र
कल्याण प, जिल्हा ठाणे.
महाराष्ट्र राज्य.
फोन नंबर ८६ २५ ०४ ८९८१





0 Comments: