सिंधुदुर्गातील नरडवे गावच्या दोन सुपुत्रांना पुरस्कार देऊन सन्मानित

सिंधुदुर्गातील नरडवे गावच्या दोन सुपुत्रांना पुरस्कार देऊन सन्मानित

 सिंधुदुर्गातील नरडवे गावच्या दोन सुपुत्रांना पुरस्कार देऊन सन्मानित 



दैनिक मुंबई मित्र, दैनिक वृत्त मित्र चे संपादक, व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित राणे युथ फौंडेशनच्या वतीने 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगांव पश्चिम येथे समाजातील गुणवंत व्यक्तीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.         

     त्यामध्ये  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे सुपुत्र नरडवे धरणग्रस्त समन्वय समिती मुंबईचे अध्यक्ष सुरेश सहदेव ढवळ यांना समाज भूषण हा पुरस्कार तर पत्रकार, संपादक, कवी संतोष गोपाळ सावंत उर्फ हरिसंतोष यांना पत्रभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

   


 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे भाजप अध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद शेलार, वृत्तपत्र लेखक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगले, शिवसेना मा. नगरसेविका सुलोचना चव्हाण, गगनभेदीचे संपादक पत्रकार अनिल थत्ते,  प्रा. मोरे मॅडम, मुंबई मित्र संपादिका सौ. अनघा अशोक राणे, वास मीडिया प्रा. लि. सी.इ.ओ. अमोल राणे, राजकीय विश्लेषक अशोक राणे, व इतर मान्यवर उपस्थित होते.




मुंबई मित्र चे संपादक वास मीडिया प्रा. लि. चे सर्वेसर्वा अभिजित राणे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, पुरस्कार मान्यवरांचे कौतुक करून सामाजिक, कला क्रीडा, साहित्य,व पत्रकारिता क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले हाच आमचा सन्मान आहे, असे म्हणाले, 

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हिरवे यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले.

0 Comments: