लाल बावटा रिक्षा युनियनने मानले शिवसेना मंत्र्यांचे आभार
रिक्षाभाडेवाढीचे स्वागत
डोंबिवली ( शंकर जाधव )
मुंबई महानगरात १ मार्च पासून काळ्या पिवळ्या रिक्षा टँक्सीच्या भाड्यात किमान तीन रुपायांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.या भाववाढीचे स्वागत डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा युनियनने केले आहे.लाल बावटा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी समाज माध्यमातून याबाबत निवेदनातून परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले आहेत.
रिक्षाभाडेवाढी संदर्भात कोमास्कर म्हणाले, २०१४ पासून सरकारने रिक्षा -टँक्सी चालकांना भाडेवाढ दिली नव्हती. जगातील सर्व वस्तूंच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत.फक्त रिक्षा-टँक्सीची भाडेवाढ रोखण्यात आली होती.रिक्षा-टँक्सी भाडेवाढी बाबत हकीम समिती व खटुआ समीतीच्या शिफारशी राज्य सरकारने स्विकारलेल्या असताना सरकारने आठ वर्षे रिक्षा-टँक्सीची भाववाढ रोखून धरली होती.आठ वर्षे महाराष्ट्रातील विविध रिक्षा-टँक्सी संघटना या भाववाढीची मागणी करीत होत्या.२०२० मार्च पासून लाँकडाऊनमुळे सहा महिने तर रिक्षा-टँक्सी पूर्णपणे बंद होत्या. सहा महिन्यानंतर सुरू करूनही ट्रेन, शाळा,काँलेज इत्यादी बंद असल्याने रिक्षा-टँक्सी रस्त्यावर धावत होत्या.एक महिन्यापासून थोड्या प्रमाणात ट्रेन, शाळा, काँलेज सुरू झाल्या.तरीही धंदा पूर्वी सारखा होत नसे, त्यातच आता पुन्हा कोरोनाची संख्या वाढत असल्याने भाडेवाढ होऊनही रिक्षा-टँक्सी चालकांना काही महिने पोटभर धंदा मिळेल का? याबाबत प्रश्नच आहे.
चौकट
सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून रिक्षा-टँक्सी चालक-मालक सावकारी कर्जात मोठ्या प्रमाणात अडकला आहे.कर्ज घेतलेल्या कंपनीच्या गुंडांनी कर्जदार रिक्षा चालकांना धंदा करणे व जगणे मुश्कील केले आहे. रिक्षा-टँक्सी चालकांच्या अशा वाईट परिस्थितीत २०१४ पासूनची प्रलंबित व कायदेशीर हक्काची भाववाढ देऊन, सरकारने रिक्षा-चालकांना फार मोठा दिलासा दिला आहे आणि भाडेवाढीचा प्रश्न सोडवला आहे.




0 Comments: