शिवसेना माजी नगरसेवक वसंत भगत यांच्यावतीने आधार कार्ड शिबीर
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील मढवी बंगला , वाॅॅर्ड क्र ६७ येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा प्रभागातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.आधार उद्योग, गुमास्ता लायसन्स, पँन कार्ड, अफिडेवीट, गँझेट - नाव बदलणे, मँरेज सर्टिफिकेट, क्रिमिलेअर सर्टिफिकेट, इनकम सर्टिफिकेट, फूड लायसन्स, आपले सरकार अंतर्गत योजनेचे कागदपत्र एकाच कार्यालयात तयार करुन देण्यात आल्यामुळे नागरिकांचे परवड कमी झाली.अनेक नागरिकांना शाळा- महाविद्यालयात प्रवेश, सरकारी काम, आरोग्य सेवा यासाठी सहजपणे आवश्यक कागपत्रे तयार करून मिळाली.वसंत भगत यांनी हि डिजिटल यंत्रणेद्वारे सोय उपलब्ध करीन दिल्याने नागरिकांनी भगत यांना धन्यवाद दिले.





0 Comments: