आज ,नयनात नयनांची
जादू कशी जाहली
सांग सखे कानात माझ्या
तुझ्या गालावरी लालसर
लाली कशी आली ...!!
पापण्यांच्या आडून तू
नजर बाण का ग सोडला
तो येऊन बघ ना सखे
माझ्या ह्रदयालाच कि ग भिडला... !!
आता ह्रदयाची धकधक वाढली
तुझ्या तिरछ्या नजरेने
हळूच माझी ह्रदयितली तार छेडली
माझा मी आता माझा ना राहीलो
तुझ्या नयन इशा-याने पुरताच
घायाळ सखे जाहलो... !!
ओठ गुलाबी गुलकंद जसे
हळूच पिळवटून घ्यावे वाटतसे
लाजून जरा फिरवलीस तू मान
जशी इंद्रधनूची ती भासली कमान...!!
गोरा कमणीय बांधा शोभतो तुला
म्रुग कांचनाचा भास होतो मला
पाठीवरती रुळते तुझ्या केसांची वेली
भासते सळसळती नागिणच आली...!!
लटपट लटपट जशी तू चालते
मंदतरंगात जणू धरणी हालते
तुला भेटायला जीव माझा घुटमळला
बघ सखे आज व्हँलेटाईनचा
दिवसच कि गं साक्षात ऊजाडला...!!
रचनाकार ©️®️ कवी =दीप.
कल्याण प, जिल्हा ठाणे.
महाराष्ट्र राज्य. 14/02/2017.
मो.क्र. ८६० ५५ ६४ ८६८.




0 Comments: