ज्युनिअर एम.एफ.हुसेन (चित्रकार) म्हणून वयाच्या १३ व्या वर्षात पुरस्कार
पत्रकार : प्रविण बेटकर
मोबा.-९५९४४०१९२२
डोंबिवली (ठाणे)
शिवजयंतीच्या निमित्ताने झालेल्या चित्रकला स्पर्धेत कु.सिद्धांत सचिन नांगरे मॉडेल इंग्लिश हायस्कूल कल्याण पूर्व येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी याचा सुप्रसिद्ध चित्रकार एम.एफ.हुसेन यांच्या नावाने "ज्युनियर एम.एफ.हुसेन" म्हणून वयाच्या १३ व्या वर्षी महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री.जितेंद्र चौधरी साहेबांच्या अथक प्रयत्नांने श्री.साईनाथ गोईकेणे- कल्याण शहर युवा अध्यक्ष (भाजपा) व श्री.प्रेमनाथ म्हात्रे साहेब- कल्याण शहर अध्यक्ष (भाजपा) यांच्या शुभहस्ते चित्रकलेसाठी लागणारे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. चित्रकलेची लहानपणापासूनच आवड असलेल्या सिध्दांतने आपला चित्रकलेतील नवीन सिद्धान्त मांडून जीवनात आई-वडील, शिक्षक यांच्या सोबत आपले नाव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात उज्ज्वल करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे. सिद्धांतने खूप कमी वयात दाखवलेल्या चित्रकलेमूळे आजूबाजूच्या विभागात सिद्धांतच्या कलेची खूप कौतुक केले जात असून त्याचा सार्थ अभिमान व आदर्श वाटत आहे.






0 Comments: