कविता- सपान (सौ.सुरेखा अशोक गावंडे )

कविता- सपान (सौ.सुरेखा अशोक गावंडे )

 सौ.सुरेखा अशोक गावंडे  

"औदुंबर" निवास,

आशिर्वाद जनरल स्टोअरच्या समोर ,हनुमान नगर, काटेमानिवली,कल्याण -पूर्व

कल्याण -४२१३०६

भ्रमणध्वनि-- ९८६९११६४४४



©️कविता- सपान 


कौलारु खोपी,भकास रान

तुझ्या येण्याकडं लागलं ध्यान!!


हताश पॉर,भूकेचा काळ

गवसी तुला रं चुलीचा जाळ!!


घशात ओतल,घोटभर पाणी

तुझी हुरहुर,माझ्या रं मनी!!


वाट बघूनश्यान,थकला जीव

कवा येईल धन्याला कीव!!


रातला डोळा,लागला न्हाई

इपरित आसं,घडलया काई!!


कोवळ ऊन,पेटून ऊठलं

पाय शेताकडं,धावत सुटलं!!


कोरड्या दुष्काळानं,अखेर घेरलं

धन्यान जीव,झाडाला टांगल!!


दुष्काळ,कर्जान, सार खपलं

बळीराजाचं सपान,धुळीत माखलं!!


 ©️.. कवयित्रीः- सुरेखा गावंडे



0 Comments: