आज मराठी राजभाषा दिन त्या  निमित्ताने कुसुमाग्रज यांना वंदन

आज मराठी राजभाषा दिन त्या निमित्ताने कुसुमाग्रज यांना वंदन

आज मराठी राजभाषा दिन त्या  निमित्ताने कुसुमाग्रज यांना वंदन

आपल्या साठी संकलित माहिती.👇


एैसे बोल कौतुके मऱ्हाठी


माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा 

हिच्या संगानं जागल्या

दऱ्या खोऱ्यातील शिळा


हिच्या कुशीत जन्मले

काळ कणखर हात

ज्यांच्या दुर्गम धीराने

केले मृत्युवरी मात 


नाही पसरला कर

कधी मागायास दान

स्वर्ण सिहासना पुढे

कधी लवली ना मान


हिच्या गगनात घुमे

आद्य स्वातंत्र्याची व्दाही*

हिच्या पुत्रांच्या बाहूत*

आहे समतेची ग्वाही


वि वा शिरवाडकर (कुसूमाग्रज)


 जगभरात विखुरलेल्या मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मराठी साहित्यास अजरामर साहित्य कलाकृती देणारे आणि जगभरात मराठी साहित्याचा झेंडा रोवणारे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी पद्मभूषण विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो १९८७ साली त्यांना नटसम्राट या नाटकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्या नंतर तत्कालीन शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे  जाहीर केले आणि तेव्हा पासून हा दिवस शासन स्तरावरून तसेच विविध साहित्य संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो या साठी जागतिक मराठी अकादमीने पुढाकार घेतला होता


 कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अतुलनिय आणि अवर्णनिय असून त्याचा वारसा भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवत राहवा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. 


 पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांना लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेली साहित्य रचना त्यांच्या लिखाणातून प्रकटत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यकृतीसाठी १९७४ साली 'नटसम्राट' या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला


"माझा मराठाचि बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।


ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।"


खरं तर मराठी लेखनाची सुरूवात संत ज्ञानेश्वरा पासून झालेली आहे त्या आधी फक्त संस्कृत भाषेतील साहीत्य अस्तित्वात होते संताचे ऋषींचे चांगले विचार

 अनेक जनसामान्यांपर्यंत पोहचावेत व ते विचार त्यांनी जीवन उन्नतीसाठी घ्यावेत यासाठी संत ज्ञानेश्वरांनी पुरातन ग्रंथांचे भाषांतर तसेच स्व निर्मिती साहीत्य हे मराठी भाषेतून केले ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय ! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी या मराठी ग्रंथातून केला कालतंराने संत साहीत्यातून मराठी प्रसार व प्रचार विपूल प्रमाणात वाढत गेला त्या संत ज्ञानेश्वर संत मुक्ताई संत जनाबाई संत सखूबाई यांच्या ओव्या संत तुकाराम संत नामदोव यांचे अभंग  संत एकनाथांचे भारूडांनी मराठी भाषेतून लिखाण करून मराठी भाषेला सुगीचे दिवस आले  तद् नंतर आधुनिक काळात अनेक नामवंत साहीत्यिक लेखक कवी कथाकार यांनी मराठीत दर्जेदार साहीत्यकृतीचे निर्माण  करून  मराठी भाषेला सर्वांगाने समृध्द करून चार चांद लावले


ओवी


जवं  प्रकृतीचे अधिष्ठान

तन्व सांडी मांडी हे अज्ञान

जिचे श्री गुणाधीन आपसी असे


 संत ज्ञानेश्वर


अभंग


सुंदर ते ध्यान 

उभा विटेवरी

कर कटेवरी ठेवोनिया


 संत तुकाराम


भारूड


कर जोडोनि विनवितो तुम्हा

तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा

नको गुंतू विषय कामा

तुम्ही आठवा मधूसुदना


संत एकनाथ


शाहिरी


सुंदरा मनामध्ये भरली

जरा नाही ठहरली 

हवेलीत शिरली

मोत्याचा भांग तिचा वाकडा

अरेरे.. हावूस नाही पुरली 


राम जोशी


आधुनिक कविता


प्रीती मिळेल का हो बाजारी

प्रीती मिळेल का हो शेजारी 

प्रीतीचे नसे अशी ग मात

पहा शोधूनी ह्रदयात


केशवसुत


नवकविता

प्रेमाचे लव्हाळे

सौंदर्य नव्हाळे

शोध आसपास 

मुडद्याची रास

🎼बा.सी.मर्ढेकर🎼


गजल

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते 

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते 

🎼सुरेश भट🎼


हायकू

पाया पाशी फुटली लाट

पाणी आले गेले

मी फक्त पहात राहीले 


शिरिष पै


तसेच दलित कविता ग्रामीण कविता आदिवासी कविता प्रेम कविता बाल कविता स्रीवादी कविता वास्तव कविता असे वेगवेगळे प्रवाहातील विविध विषय अनेक लेखक कवीनी हाताळून मराठीचा गोडवा जगभर पोहचवला



लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी


जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी


धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी


एवढ्या जगात माय मानतो मराठी


अशा ह्या सर्वांग सुंदर मायबोली मराठी भाषेचा सर्वाना सार्थ अभिमान असला पाहीजे व तीचे संवर्धन संगोपन करणे मराठीतील महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे

0 Comments: