माझ्या कवितेने...
माझ्या कवितेने मला
प्रतिभेच्या पाळण्यात झुलवावे,
कल्पनेच्या स्वरांचे
अंगाई गीत गात निजवावे!
माझ्या कवितेने मला
प्रतिष्ठेचे दान देत जगवावे
ज्येष्ठ अन श्रेष्ठ कवींच्या पंगतीत
सन्मानाने बसवावे,
माझ्या कवितेने मला
व्याकरणाचे सखोल ज्ञान द्यावे
पाठ्य पुस्तकात जाणता कवी म्हणून
अभिमानाने मिरवावे,
माझ्या कवितेने मला
एखाद्या शिलालेखात कोरावे
कवी म्हणून खांद्याला
झोळी लावून फिरताना
तिच्या ऐश्वर्याच्या पालखीत सजवावे
माझ्या कवितेने मला
आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे संतुष्ट करावे
कुठे तरी कधी तरी कुणा रसिक डोळ्यात
मूर्तिमंत असे माझे स्मारक उभारावे
माझ्या कवितेने मला अमरत्व मिळवूनी द्यावे.
कवी सूर्यकांत शंकर आंगणे
ताडदेव बने कंपाऊंड
मुंबई - ४०००३५
मो. क्र. ८१०४०६२९५०




0 Comments: