पाथर्ली गावठाण येथे रस्त्याच्या क्राँकिटीकरणाचा कामाचा शुभारंभ
डोंबिवली ( शंकर जाधव ) प्रभाग क्र.७४ पाथर्ली येथील भारतीय जनता पक्षाचे नगर निलेश म्हात्रे यांच्या प्रभागात रस्त्याच्या क्राँकिटीकरणाचा कामाचा शुभारंभ करण्यात आला. गोपाळ नगर गल्ली नं.२ येथे शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक निलेश चिंतामण म्हात्रे, अनिल ठक्कर, माणिक म्हात्रे, अनुप कदम, जयस्वाल,प्रताप ठक्कर, भाजपचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याक्राँकिटीकरणामुळे वारंवार रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे कामामुळे खोदकाम करावे लागणार नाही.खोदकाम मुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.क्राँकिटीकरणाचे रस्ते अनेक वर्ष टिकून राहतात.या रस्त्याचे दोन टप्प्यात काम होईल.पहिल्या टप्प्यात नवदिपगंगा ते गुलाबनगर सोसायटी आणि दुसऱ्या टप्प्यात नरेश अपार्टमेंट ते नवदिपगंगा सोसायटी अश्या पध्दतीने नियोजन पुर्ण काम करण्यात येत आहे. असे निलेश म्हात्रे यांनी सांगितले.क्राँकिटीकरण रस्ता तयार होत असल्याने प्रभागातील अनेक नागरिकांनी शुभारंभ प्रसंगी समाधान व्यक्त केले.





0 Comments: