डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने शिवरायांची जयंती साजरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जंयती डोंबिवली शहर कॉग्रेस ब्लॉक कमिटीच्य वतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी डोंबिवली शहर पूर्व विभाग ( ए) ब्लॉक अध्यक्ष सदाशिव शेलार, डो.पूर्व ब्लॉक ( बी ) अध्यक्ष नवेन्दू पाठारे ,डोंबिवली शहर पूर्व ब्लॉक जनरल सेक्रेटरी अशोक कापडणे,डोंबिवली पश्चिम ब्लॉक कार्यअध्यक्ष एकनाथ म्हात्रे, पर्यावरण विभाग सचिव वर्षा शिखरे, उपाअध्यक्ष मयुर शेळके, कल्याण-डोंबिवली महानगर आरोग्य विभाग अध्यक्ष जितेंद्र मुळे ,अभय तावडे , दशरथ म्हात्रे ,अजय पौळकर, दिप्ति दोशी, महिला ब्लॉक अध्यक्षा ग्रीष्मा दोषी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अर्पण केले.





0 Comments: