नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा
डोंबिवली ( शंकर जाधव ) अनेक वर्षापासून डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवर माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुजित नलावडे यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गणेशोत्सव अथक मेहनत घेत असतात.मंडळाच्या वतीने दरवर्षी वह्या वाटप, छत्री वाटप,पुस्तके वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम राबिवले जातात. माघी गणेशोत्सवात नलावडे म्हणाले,आज आपला देशच कोरोना महामारीशी लढत आहे.जगावरील हे संकट देशावर लवकरात लवकर निघून जावे अशी श्री गणेशाकडे प्रार्थना करतो. जोपर्यत आपला देश कोरोनामुक्त होत नाही तोपर्यत सर्व नागरिकांनी मास्क,सॅनेटराझर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.





0 Comments: