वाढीव वीजबिलाविरोधात डोंबिवलीत भाजपाचा मोर्चा..

वाढीव वीजबिलाविरोधात डोंबिवलीत भाजपाचा मोर्चा..

 वाढीव वीजबिलाविरोधात डोंबिवलीत भाजपाचा मोर्चा.. 

 


 

डोंबिवली ( शंकर जाधव )  वीज ग्राहकांनी वीज बिल भरलं नाही अशा सर्वांचे मीटर कट करण्याचा निर्णय या शासनाने घेतला आहे. हा निर्णय कीती चुकीचा आहे हे सर्व सामान्य माणसाला कळत आहे. पण पैशाच सोंग कस घ्यायचंनागरिकांकडे पैसेच नाहीतसरकार मायबाप आहे त्यांनी ही भूमिका निभवावी आणि लोकांना या बिलामध्ये सवलत द्यावी अस सर्व लोकांच मत असताना सरकार का दुर्लक्ष करीत आहे हे कळत नाही. याबाबत निवेदने देवून झालीअनेक वेळा मोर्चा काढलेन्यायालयाचे दरवाजे ठोठवले पण सरकारचे डोकं ठिकाणावर नाही असे वक्तव्य भाजपा आमदार तथा प्रदेश सरचिटणी रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले.यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालयाला डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांची भेट घेऊन निवेदन दिले.

  भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यात सरकारने वीज बिलात सवलत द्यावी या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलने केले. त्याचाच भाग म्हणून डोंबिवलीत भाजपा तर्फे एमआयडीसी निवासी विभागातील वीज वितरण कार्यालयावर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेग्रामीण अध्यक्ष नंदू परबपश्चिम अध्यक्ष प्रज्ञेश प्रभूघाटेमाजी नगरसेवक मंदार हळबे,मुकुंद ( विशू )  पेडणेकरसंदीप पुराणिकमहिला अध्यक्षा मनीषा राणेलक्ष्मण पाटीलमितेश पेणकरपूनम पाटीलराजेश म्हात्रेरविसिंग ठाकूरसंजय तिवारीविनोद काळणरंजना पाटीलराजेंद्र पाटीलकृष्णा पाटील, दीपक जाधव , राजश्री पांजणकर,  यांच्यासह कार्यकर्त  मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. भाजपाचा वीज बिल सवलत मागणीचा मोर्चा भाजपा ग्रामीण जनसंपर्क कार्यालय ते निवासी विभागातील वीज वितरण कार्यालय दरम्यान ठाकरे सरकार हाय हाय’ वीज बिल माझ झालाच पाहिजे अशा घोषणानी दणाणून गेला होता. वीज कार्यालयाशी पोहोचल्यानंतर उपस्थित ग्राहककार्यकते आणि जनसामान्यांना ठाकरे सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर चव्हाणांनी सडकून टिका केले चव्हाण पुढे म्हणालेपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संकट काळात महावितरण आणि महामंडळाने चुकीच्या पद्धतीने बिले दिली. ती सरकार म्हणून मान्य केली. आम्ही वारंवार सांगितलं कि या काळात दिली गेलेली सर्व बिले सरासरी आहेत. बिल जास्त स्वरुपाची आहेत ही वस्तुस्थिती सरकारला समजली होती. आम्ही वीज बिलात सवलत देवू किंवा वीज बिल माफ करू असही सांगितलं. पण प्रत्यक्षात मंत्रिमंडळमध्ये या विषयी चर्चा करूनही कोणत्याही प्रकारे दिलासा ग्राहकांना दिला गेला नाही. हे सर्व हेतुपुरस्सर केल जात आहे. गरीब सामान्य माणसाची लुट करण्याच ठाकरे सरकारने ठरवलं आहे अस लक्षात येत आहे.राज्याचे अधिवेशन दोन दिवसात गुंडळायचलोकप्रतिनिधीनी दिलेल्या पत्राची उत्तरे द्यायची नाहीत. मग जनतेने काय करायचं. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. आता अस ठरवलं गेल आहे कि ज्यांनी वीज बिल भरलं नाही अशा सर्वांचे  मीटर कट करण्याचा निर्णय या शासनाने घेतला आहे. हा निर्णय कीती चुकीचा आहे हे सर्व सामान्य माणसाला कळत आहे. पण पैशाच सोंग कस घ्यायचंनागरिकांकडे पैसेच नाहीतसरकार मायबाप आहे त्यांनी ही भूमिका निभवावी आणि लोकांना या बिलामध्ये सवलत द्यावी अस सर्व लोकांच मत असताना सरकार का दुर्लक्ष करीत आहे हे कळत नाही. याबाबत निवेदने देवून झालीअनेक वेळा मोर्चा काढलेन्यायालयाचे दरवाजे ठोठवले पण सरकारचे डोकं ठिकाणावर नाही म्हणून आज महाराष्ट्रभर भाजपाने ज्या ठिकाणी महामंडळाचे कार्यालय आहे त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने सरकारला जाग आणायचं काम करण्याची भूमिका घेतली आहे. डोंबिवली आणि परिसरातील लोकांच्यावतीने विनंती करीत आहोत आम्हाला वीज ग्राहकांना बिलात सवलत द्या त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल.यावेळी मंदार हळबे आणि शशिकांत कांबळे यांनीही ठाकरे सरकार आणि प्रशासनावर झोड घेतली. विशेष म्हणजे वीज वितरण अधिकारी काही ग्राहकांना वीज बिल विषयी हमारातुमरी करीत असून ग्राहकांचा छळ करीत असल्याचं उघड सत्य कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्यासमोर दाखवून दिल. यावेळी बिक्कड म्हणाले जर आमचे अधिकारी तसेच कर्मचारी चुकीच काम करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.

 

**************************************************************

 

कार्यकारी अभियंता आहात का पोस्टमन आहात..  

 

जनतेची समस्या सुटाव्यात म्हणून भाजपने अनेक वेळेला महाराष्ट्र  राज्य विद्युत महावितरण कार्यालयाला निवेदने दिली.परंतु दरवेळी वरिष्ठांना निवेदन पाठवले आहेतअ असे उत्तर दिली जातात.तुम्ही कार्यकारी अभियंता आहात का पोस्टमन आहात असा सवाल माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालयाला डोंबिवली विभागीय  कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारला.

*************************************************************************

0 Comments: