कल्याणात विजबिलांबाबत भाजपचे महावितरण कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याणात भाजपकडून महावितरण विरोधात महावितरण कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे, नगरसेवक विक्रम तरे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग भोसले, मंडळ सरचिटणीस अरूण दिघे, नितेश म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रिया जाधव, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष गुड्डू खान, साऊथ इंडियन सेल अध्यक्ष सुरेन्द्र राजस्थानी सेल अध्यक्ष रूपसिंह राठोड, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार हे धोक्याचे सरकार असून हे काय बोलतात याच त्यांना भान नाही. निवडणूकीच्या वेळी मत मागताना शेतक:यांच्या बांधावर जाऊन २५ हजार हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते. कजर्माफी दिली होती. सरकारी बॅका या पक्षातील नेत्यांच्या आहेत. म्हणून कजर्माफी दिली. बॅकेने ते पैसे वसूल करून घेतले. लोकांना नुकसान भरपाई दिली नाही. जगात कोरोनाची लाट आली होती. सरकाराने जनतेला वीजबिल कमी करू, वीजबिलात तीन महिन्यांची सूट देऊ, वीजबिल कमी करू अशी वेगवेगळ्य़ा प्रकारची आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल केले आहे. आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना पोलिस यंत्रणोचा वापर करून सर्वसामान्य लोकांची विज कनेक्शन कापले जात आहे. कल्याणमध्ये काही दिवसापूर्वी शिवसेना आणि महायुतीच्या नेत्यांनी आणि काही नगरसेवकांनी घोषणा केल्या की विजबिल कमी न केल्यास महावितरणाचे कार्यालय बंद करू. मग हे नेते आता झोपा काढत आहे का? असा सवाल गणपत गायकवाड यांनी केला आहे. भाजप शांततेने आंदोलन करीत आहे पण पोलिस बळाचा वापर करीत हे सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सरकार आंदोलन होऊ देत नाही, असा आरोप ही आमदार गायकवाड यांनी केला आहे. भाजपने विजबिलाविरोधात आंदोलन करताच शिवसेनेने पेट्रोल दरवाढीबाबत आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्राच्या बाजूच्या राज्यात गोवा, कर्नाटक, गुजरात या सर्व ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. या राज्यात सात ते नऊ रूपये लीटरमागे कमी आहे. हे लोक आंदोलन कोणाच्या विरोधात करीत आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यात पेट्रोल स्वस्त असल्याचा टोला गायकवाड यांनी शिवसेनेला लगावला आहे.





0 Comments: