प्रिय कविता हिस

प्रिय कविता हिस


 




तू जर नाही दिसली, ना कधी आली मनी ।

तर उदास होते मन, विसरतो अन्न पाणी ।। १।।


तुझ्या तीन अक्षराच्या नावाने भुरळ घातली।

तुझे नाव घेतल्याविना, कधी नाही मरगळ हटली।।२।।


तू जेव्हा जेव्हा माझ्या यायचीस मनात ।

तेव्हा तेव्हा मी सदा असायचो आनंदात ।।३।।


पण हल्ली, का माझ्यापासून दुरास्त झालीस ।

सांग प्रिय कविता,तू मला नेहमीच हवीस ।।४।।


तुझ्या येण्याने,बहरण्याने मन माझें फुलते ।

तुझी रचना पाहिल्यावरच मन तृप्त होते ।।५।।


तुझ्या शब्दखेळांत नेहमीच मग्न राहतो ग।

कारण तूच माझी कविता जीव की प्राण असतो ग।।६।।


प्रिय कविता कधी नको रुसु, नको ठेऊ रोष ।

तुझ्याविना जीवनात मला कसा राहील संतोष?।।७।।


 (कवी हरिसंतोष) 

 संतोष गोपाळ सावंत 8779172824 

रविवार दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते १०.३० पर्यंत वाजताची रचना

0 Comments: