महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरोधात ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरोधात ठिय्या आंदोलन

 महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरोधात ठिय्या आंदोलन

  कंत्राटी कामगार व वाहनचालक यांची पिळवणूक, कामगारांवर उपासमारीची वेळ 


पत्रकार प्रविण बेटकर

मोबा.-९५९४४०१९२२

डोंबिवली (ठाणे)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या  हलगर्जीपणा व दुर्लक्षपणाला सामोरे जात आज दि.१२ फेब्रु. २०२१ रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या खंबाळपाडा वाहनतळावर विशाल एक्सप्रेस प्रा.लि. चे कंत्राटी कामगार व वाहनचालक यांनी पहाटे ६ वा. पासून ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशाल एक्सपर्ट या कंत्राटी कामगार व वाहनचालक यांचे चार महिन्यापासून चे मासिक वेतन महापालिकेने अद्याप दिलेले नाही त्यामुळे लोकांनी इतरत्र केलेली घाण साफ करणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असून काहींना आपली भाड्याची घर खाली करून रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. कित्येकांना या कोरोना संसर्गाचा आपले प्राण गमवावे लागले. तरी त्यांच्या कुटुंबाची अद्याप पालिका किंवा कंत्राटदार यांनी दखल घेतलेली नाही. संपूर्ण देशभर कोरोना प्रादुर्भाव असून सुद्धा कामगार व वाहनचालक यांनी कुटुंबाची उपासमार करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत साफसफाईची सेवा करत चाकरी केली. परंतु कडोंमपा व विशाल एक्सपर्ट प्रा. लि. हे मिळून कंत्राटी कामगार व वाहन चालकांची पिळवणूक करत आहेत हे यातून स्पष्ट दिसून येत आहे. म.न.का.से चे उपाध्यक्ष उज्जैनकर साहेब व युनिट अध्यक्ष मच्छिद्र तांदळे व विजय मोहिते, संतोष चव्हाण, संजय चव्हाण आदीनी सर्व युनिट मार्फत सांगितले की, वेळेवर महापालिका किंवा कंत्राटदार आमचा कधीच पगार करीत नसल्याने आमच्या सभासदांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे आणि आम्ही त्रस्त झालेले आहोत आमचा पगार होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा करून पालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली. काही पालिका कर्मचाऱ्यांनी दोन-तीन दिवसात तुमचा निदान दोन महिन्याचा पगार होईल अशी ग्वाही दिली. त्यानंतर मनकासे विजय असो, राज ठाकरेंचा विजय असो,महापालिका हाय हाय, पगार आमच्या कष्टाचा नाही कुणाच्या बापाचा अश्या घोषणाबाजी करत आंदोलन आटोक्यात घेण्यात आले.

0 Comments: