शिवाजी महाराज एक कुशल नागरिक प्रशासक

शिवाजी महाराज एक कुशल नागरिक प्रशासक

 शिवाजी महाराज एक कुशल नागरिक प्रशासक





 कोणत्याही कार्याचा आरंभ लहानशा मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत केलेले आढळते. या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराज हे एक कुशल प्रशासक होते हे त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयावरून आपल्या निदर्शनास आल्या शिवाय राहत नाही .छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्याची विभागणी चार विभागात केलेली आढळते आणि प्रत्येक विभागाचा प्रमुख म्हणून  मामलतदार असे .राज्याचे प्रशासन योग्य रीतीने चालावे, लोकांच्या समस्या, गरजा , उणीवा ,शंका यांचे निरसन व्हावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चारही विभागात लक्ष देत असत .सत्तेचे विकेंद्रीकरण तसेच अनेक लोकांना प्रशासकीय अनुभव मिळावे व नेतृत्वगुण जे इतरांमध्ये आहेत त्याचा विकास व्हावा या उद्देशाने शिवाजी महाराज नेहमी आग्रही राहत होते हे या एकंदरीतच त्यांच्या निर्णयावरून आपणास समजत असते.


 छत्रपतींचे प्रशासकीय धोरणे, निर्णय ,संवाद हे मानवीजीवनासाठी अतिशय अनुकूल आणि दीर्घकालीन परिणाम करणारे होते. आजही आपण वर्तमान काळात त्यांच्या धोरणाचा अनुभव घेऊ शकतो, त्यांनी कायम स्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिल्याचे आपण इतिहासातील पुराव्यावरून पाहू शकतो ते कायम स्त्रियांचा आदर करत असत तसेच त्यांच्या प्रशासकीय कामकाजातील लोकांना ते सक्त ताकीद देत असत की  कोणत्याही वर्गातील स्त्रीचा आदर हा राखला गेला पाहिजे .


शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवन  कार्यात राज्याच्या उत्पन्नासाठी चौथ व सरदेशमुखी या दोन पद्धतीच्या करांची अंमलबजावणी जे अन्नधान्याच्या माध्यमातून वसूल केल्याचे निदर्शनास येत असते .चौथ व सरदेशमुखी या कर प्रणालीच्या माध्यमातून लोकांच्या मनात ही भावना जागवली की आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपण शासनास दिला पाहिजे . चौथ याचा साधा आणि सोपा अर्थ म्हणजे उत्पन्नाचा चौथा भाग म्हणजेच एक चतुर्थांश होय. सरदेशमुखी लोकांचे हित रक्षणासाठी तर चौथ हे बाह्य शक्ती पासून संरक्षण करण्यासाठी असे .तसेच अष्टप्रधान मंडळ देखील त्या काळातील उत्तम संगनमताने राज्यकारभार चालवण्याचे तंत्र होते. अष्टप्रधान मंडळ हे महाराजांना सल्ला देण्याचे तसेच प्रशासन चालविण्यासाठी मदत करणारे मंडळ होते.


 तत्कालीन काही लेखन कौशल्य कारांनी काही अंशी तलवार युक्त शिवाजी महाराज जास्त प्रमाणात जगापुढे आनल्याने महाराजांची उत्तम अशी कुशल प्रशासक ही बाजु झाकली गेल्याचे निदर्शनास येत असते .शिवाजी महाराजांची कुशल नागरिक प्रशासक ही जीवनातील महत्वपूर्ण बाजू झाकली  गेल्याने लोकाभिमुख, सर्वधर्मसमभाव शिवाजी महाराज असून देखील तलवारीच्या जोरावर विशिष्ट समुदायावर आक्रमणकारी शिवाजी अशीच प्रतिमा उभी केली गेली ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल व एक बहुआयामी महान व्यक्तीच्या कार्याला वेसन घातले गेले.



                                                                                                     दिनांक .01/02 /2021.

       


           10 अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार .

                      हेमकांत मोरे, मीडिया प्रभारी.          

                     बामसेफ युनिट,  नंदुरबार. 

                    मो.नं.94 23 91 70 74 

                    94 04 49 24 03.






0 Comments: