१९ हजार वेळा रबरस्टॅपच्या ठश्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र
डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील सागाव येथील शिवमंदिरात रबरस्टॅपच्या ठश्याने जय शिवराय असे १९ हजार वेळा लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाडले.डोंबिवलीतील कलाकार श्रद्धा पाटील यांच्या कलेने साकारलेले महाराजांचे चित्र पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. श्रद्धा पाटील यांच्या या कलेचे डोंबिवलीकर कौतुक करत असून आपली कला समाजासमोर आणावी अश्या उद्देशाने पाटील यांनी यापूर्वीही आपली कला सदर केली होती.





0 Comments: